मुंबई

मुंबईत ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान

१८ वर्षांवरील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून स्त्रियांच्या आरोग्याविषयीदेखील जनजागृती केली जाणार आहे

प्रतिनिधी

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबवण्यात येत आहे. १८ वर्षांवरील माता, गरोदर महिला व महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत महिलांची तपासणी करत प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. दरम्यान, नवरात्रोत्सवात १८ वर्षांवरील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून स्त्रियांच्या आरोग्याविषयीदेखील जनजागृती केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वंकष आरोग्य तपासणीसाठी २६ सप्टेंबरपासून नवरात्री उत्सवात ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे.

सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन

महिलांच्या सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशनसुद्धा या अभियानातून करण्यात येणार आहे. या अभियानात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी/ तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरी आरोग्य केंद्रे, दवाखाने, प्रसूतिगृहे, सर्वसाधारण रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालये येथे २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत महिलांची प्राथमिक तपासणी, उपचार व समुपदेशन करण्यात येईल, असेही डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

वादळी व्यक्तिमत्त्वाची अखेर...

आजचे राशिभविष्य, २९ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Ajit Pawar Death : दुसऱ्यांदा लँडिंगच्या प्रयत्नावेळी क्रॅश झाले विमान; पायलटचे अखेरचे शब्द...ओह शिट...ओह शिट

अजित दादांना उद्या अखेरचा निरोप! पार्थिवावर सकाळी ११ वाजता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानात अंत्यसंस्कार

"दिलदार मित्र गेला..." अजितदादांच्या निधनानंतर फडणवीसांनी व्यक्त केले दुःख; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा; आज शासकीय सुट्टी