प्रातिनिधिक छायाचित्र 
मुंबई

Mega block Update : मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक नाही

रेल्वे रुळांची देखभाल दुरुस्ती, सिग्नल, ओव्हरहेड वायर्स आणि अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार नाही.

Swapnil S

मुंबई : रेल्वे रुळांची देखभाल दुरुस्ती, सिग्नल, ओव्हरहेड वायर्स आणि अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार नाही.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.३४ ते दुपारी ०३.०३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/सेमी-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील, त्या त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद/सेमी-जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावरून वळवल्या जातील.

सीएसएमटी /दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावरून वळवल्या जातील.

हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेल येथून सीएसएमटी मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ब्लॉक कालावधीत या सेवा चालविणार

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी विभागात विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाइन सेवा आणि बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाइन सेवा उपलब्ध असतील.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश