प्रातिनिधिक छायाचित्र 
मुंबई

कसारा स्थानकादरम्यान आज, उद्या ब्लॉक; उड्डाणपुलाच्या तुळई उभारणीचे काम करणार

कसारा स्थानकातील उड्डाणपुलाच्या तुळई उभारणीसाठी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवारी तीन टप्प्यांत हा ब्लॉक असेल.

Swapnil S

मुंबई : कसारा स्थानकातील उड्डाणपुलाच्या तुळई उभारणीसाठी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवारी तीन टप्प्यांत हा ब्लॉक असेल. शनिवारी सकाळपासून सुरू होणाऱ्या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे, तर कसारा येथे येणाऱ्या लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहेत.

पहिला ब्लॉक शनिवारी सकाळी ११.४० ते दुपारी १२.१० वाजेपर्यंत कसारा स्थानकाच्या अप आणि डाऊन मार्गावर घेण्यात आला आहे, तर दुसरा आणि तिसरा ब्लॉक रविवारी सकाळी ११.४० ते दुपारी १२.१० आणि दुपारी ४ ते दुपारी ४.२५ या वेळेत कसारा स्थानकाच्या अप आणि डाऊन मार्गावर असेल. ब्लॉक कालावधीत शनिवारी आणि रविवारी सकाळी ९.३४ वाजता सीएसएमटी येथून सुटणारी कसारा लोकल आसनगावपर्यंत चालवण्यात येईल, तर आसनगाव ते कसारा स्थानकादरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.

रविवारी दुपारी १.१० वाजता सीएसएमटी येथून सुटणारी कसारा लोकल कल्याणपर्यंत चालवण्यात येणार आहे. तर कल्याण ते कसारा लोकल ब्लॉकमुळे रद्द करण्यात येईल. शनिवारी आणि रविवारी सकाळी ११.१० वाजता कसारा येथून सुटणारी सीएसएमटी

लोकल आसनगाव स्थानकामधून सुटेल. तर कसारा ते आसनगावदरम्यान ही लोकल सेवा उपलब्ध नसेल.

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद, तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

n मुख्य मार्गावर माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५६ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री वसई रोड ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.४५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत विरार ते भाईंदर/बोरिवली दरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, तर काही अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा