संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मध्य रेल्वेवर आज आणि रविवारी ब्लॉक; बदलापूर ते खोपोली दरम्यान 'या' वेळेत लोकल रद्द

मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत यार्ड सुधारणेच्या कामासाठी शुक्रवार १७ जानेवारी आणि रविवारी १९ जानेवारी रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत यार्ड सुधारणेच्या कामासाठी शुक्रवार १७ जानेवारी आणि रविवारी १९ जानेवारी रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोली दरम्यान उपनगरीय सेवा रद्द ठेवण्यात येणार आहे.

कर्जत स्थानकावरील पोर्टल्स ऑफ लोड करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार शुक्रवारी दुपारी १.५० ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. पळसदरी आणि कर्जत स्थानकांदरम्यान अप आणि मध्य लाईन आणि कर्जत प्लॅटफार्म ३ च्या पनवेल एंड क्रॉसओवरसह ते चौक/भिवपुरी स्टेशन (क्रॉसओवर वगळून) दरम्यान अप आणि डाऊन लाईनवर ब्लॉक असेल.

ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोली दरम्यान उपनगरीय सेवा रद्द राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १२.२० वाजता सुटणारी खोपोली लोकल आणि दुपारी १.१९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सुटणारी कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.

रविवारी ब्लॉक कालावधीत नेरळ आणि खोपोली दरम्यानच्या उपनगरीय सेवा रद्द राहतील. तर कर्जत येथून रविवारी दुपारी १२.०० आणि १.१५ वाजता सुटणाऱ्या तसेच खोपोली-कर्जत लोकल दुपारी ११.२० आणि १२.४० वाजताच्या उपनगरी ट्रेन रद्द असतील. तर सकाळी ०९.२७ ते ११.१४ या वेळेत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत उपनगरी ट्रेन नेरळ स्थानकावर थांबविण्यात येणार आहेत.

GST ५ आणि १८%; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

२३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल