मुंबई

तांत्रिकी कामांसाठी आज ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

प्रतिनिधी

विविध तांत्रिक कामांसाठी रविवार, ३१ जुलै रोजी हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर बोरीवली-गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे यादरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी, वडाळा-वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील. तर सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गावर मात्र मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५पर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे या दोन्ही स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल