मुंबई

तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

दुरुस्तीच्या कालावधीत काही लोकल उशीराने धावणार असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत

नवशक्ती Web Desk

रूळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर तसेच सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, २ जुलै रोजी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत काही लोकल उशीराने धावणार असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत दुरुस्तीचे काम होणार आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड-माटुंगा स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.‌ त्यामुळे ट्रेन मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर कुर्ला व सायन स्थानकांवर थांबणार आहेत. तर ठाणे स्थानकातून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकल मुलुंड-माटुंगा धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यामुळे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला व सायन स्थानकावर थांबतील. तर पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर मार्ग वगळून) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत पनवेल स्थानकातून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून पनवेल-बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर पनवेल स्थानकातून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल व ठाणे स्थानकातून पनवेलसाठी जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, ब्लॉक कालावधीत बेलापूर-खारकोपर आणि नेरुळ-खारकोपरदरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट-मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत चचगेट-मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

सीएसएमटी वाशी विशेष लोकल सेवा!

दरम्यान, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- शी भागात विशेष लोकल धावणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईनवर लोकल सेवा उपलब्ध असतील.

कधी व कुठे

मध्य रेल्वे मार्ग

मुलुंड-माटुंगा- स. ११.०५ ते ३.५५

हार्बर मार्ग

पनवेल-वाशी - स. ११.१० ते ४.०५

पश्चिम रेल्वे मार्ग

चचगेट-मुंबई सेंट्रल - १०.३५ ते ३.३५

मेट्रो-५च्या टेंडर, अलाइनमेंटला सुरुवात; उल्हासनगरच्या विकासाला मिळणार नवी दिशा

Mumbai : पुन्हा BEST चा अपघात! पवईत इलेक्ट्रिक बस दुभाजकावर आदळली; ७ प्रवासी जखमी, चालक म्हणाला- 'कारकडे लक्ष गेलं'

Palghar Rain Alert : पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा! डहाणू-तलासरीत पूरस्थिती, रेल्वे सेवा ठप्प

Lonavala Viral Video : ट्रेकिंगदरम्यान थोडक्यात बचावला तरुण; पावसाळ्यात सुरक्षित ट्रेकसाठी घ्या 'ही' खबरदारी

Mumbai : "ड्रग्ज प्रकरणात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करेन"; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसाची धमकी, VIDEO व्हायरल