मुंबई

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

प्रतिनिधी

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील धीम्या मार्गांवर रविवार, २५ सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा आणि ठाण्यादरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर, हार्बरवर सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाउन मार्गावर, तसेच सांताक्रुझ-गोरेगावदरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे

कुठे : माटुंगा आणि ठाण्यादरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत

सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा आणि ठाण्यादरम्यान जलद मार्गावरून धावतील. त्यामुळे शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, ठाणे स्थानकांत थांबा मिळाल्यानंतर ही गाडी पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तर कल्याणहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलही ब्लॉककाळात ठाणे-माटुंगादरम्यान जलद मार्गावर धावतील.

हार्बर रेल्वे

कुठे : सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही मार्गांवर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत

या मार्गावरील लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. कुर्ला आणि पनवेलदरम्यान दर २० मिनिटानंतर विशेष लोकल फेऱ्या प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.

पश्चिम रेल्वे

कुठे : सांताक्रुझ-गोरेगावदरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

दोन्ही धीम्या मार्गांवरील लोकल सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम