मुंबई

विविध तांत्रिक कामांसाठी उपनगरीय रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, फक्त विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

प्रतिनिधी

विविध तांत्रिक कामांसाठी रविवार, १७ जुलै रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ‘मेगाब्लॉक’ घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे-कल्याण, सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई सेन्ट्रल स्थानकादरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर ‘मेगाब्लॉक’ आहे. त्यामुळे लोकल फेऱ्या विलंबाने धावतील. हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, फक्त विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत ब्लॉक आहे. यावेळी सीएसएमटी येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद, अर्धजलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल आणि त्यामुळे या दोन स्थानकांदरम्यान लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक