मुंबई

मंत्री उदय सामंतांच्या बोटीला अपघात; सर्वजण सुखरूप

राज्याचे उद्योगमंत्री आणि आमदार उदय सामंत यांच्या बोटीला अपघात झाला असून माजी खासदार छत्रपती संभाजीराचेही होते सोबत

प्रतिनिधी

शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी माजी खासदार छत्रपती संभाजीराचेही त्यांच्यासोबत असून त्यांच्यासह सोबत असलेले प्रवासी सुखरूप असल्याचेही सांगण्यात आले आहे. आज सकाळी अलिबागला जाताना मांडावा जेट्टीजवळ हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री उदय सामंत आणि संभाजीराजे छत्रपती हे इतर सहकाऱ्यांसह मुंबईवरून अलिबागला बोटीने प्रवास करत होते. यावेळी मांडावा जेट्टीजवळ ही बोट पार्क करत असताना खांबांना धडकली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. मात्र, बोटीची स्पीड कमी असल्यामुळे मोठा अपघात टळला आहे. मंत्री उदय सामंत यांच्यासोबत दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. यापूर्वीही त्यांची बोट भर समुद्रात बंद पडली होती.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग १० पदरी होणार; राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

बालभारतीच्या पुस्तकांची छपाई कमी दर्जाच्या कागदांवर; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

अजितदादांनी जपली विचारधारा! तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले

बँक खात्यात ४ नॉमिनी ठेवता येणार; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी