रशियाच्या स्टेट ड्युमाच्या निवडणुकीत मीरा-भाईंदरचा ठसा 
मुंबई

रशियाच्या स्टेट ड्युमाच्या निवडणुकीत मीरा-भाईंदरचा ठसा

रशियात १८ ते २० सप्टेंबरदरम्यान पार पडलेल्या २०२६च्या स्टेट ड्युमा निवडणुकीत भारताचे ॲड. रवी व्यास यांनी आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून सहभाग घेतला.

Swapnil S

मॉस्को/भाईंंदर : रशियात १८ ते २० सप्टेंबरदरम्यान पार पडलेल्या २०२६च्या स्टेट ड्युमा निवडणुकीत भारताचे ॲड. रवी व्यास यांनी आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून सहभाग घेतला. मीरा-भाईंदर महापालिकेचे सभागृह नेते आणि वकील म्हणून कार्यरत असलेल्या व्यास यांनी मॉस्कोतील निवडणूक प्रक्रियेचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. रशियाच्या ४५० सदस्यांच्या स्टेट ड्युमासाठी ही निवडणूक झाली.

व्यास यांनी मॉस्को शहरातील ३० हून अधिक मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान केंद्रांवरील प्रशासकीय व्यवस्था, मतदारांची ओळख पडताळणी, मतदानाची गोपनीयता आणि सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. तसेच केंद्रीय मॉनिटरिंग व निगराणी कक्षाला भेट देऊन इलेक्ट्रॉनिक आणि रिमोट डिजिटल मतदान प्रणालीची कार्यपद्धती, सुरक्षितता व डेटा संरक्षणाबाबत माहिती घेतली. रशियाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानासोबत रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधाही उपलब्ध होती. आपला अनुभव सांगताना ॲड. व्यास म्हणाले की, रशियातील मतदान प्रक्रिया शिस्तबद्ध आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी असल्याचे निरीक्षणातून दिसून आले. पारंपरिक मतदान केंद्रांसोबत डिजिटल मतदानाचा पर्याय उपलब्ध असल्याने निवडणूक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर ठळकपणे जाणवला.

रशियाच्या निवडणूक प्रक्रियेचे आंतरराष्ट्रीय निरीक्षण करण्याची संधी मिळाल्याने मीरा-भाईंदरमधील सार्वजनिक जीवनातील प्रतिनिधीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग अधोरेखित झाला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आजारपणात केलेल्या मृत्यूपत्राला मान्यता; मुंबई उच्च न्यायालयाने पत्नी, मुलांचा दावा फेटाळला

चंद्रा विरुद्ध टाटा! चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचे कायदेशीर आव्हान

अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई

Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक

Mumbai : आयआयटी प्राध्यापक मंचाचा दुल्ला यांना पाठिंबा