मुंबई

उपशाखाप्रमुख महिलेचा विनयभंग; पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Swapnil S

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या उपशाखाप्रमुख असलेल्या एका ५३ वर्षांच्या महिलेचा तिच्याच परिचित पदाधिकाऱ्याने विनयभंग केल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरून संजय सिंघण यांच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.

संजय सिंघण हे माजी नगरसेविका गीता संजय सिंघण यांचे पती तसेच मागाठणे विधानसभा समन्वयक असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदार महिला ही पूर्वी बोरिवली परिसरात होती. सध्या ती नवी मुंबईत तिच्या कुटुंबियांसोबत राहते. ती शाखा क्रमांक १२ची उपशाखाप्रमुख म्हणून काम करते. गेल्या मंगळवारी ठाकरे गटाची बोरिवलीतील गार्डन हॉलमध्ये एक आढावा बैठक घेण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर ती शाखा समन्वयक माधुरी खानविलकर हिच्याशी परिसरातील एसआरए प्रोजेक्टबाबत चर्चा करत होती. यावेळी तिथे संजय सिंघण आले आणि त्यांनी आपण कोणाकडून पैसे घेतले नसल्याचे सांगून तिच्या छातीवर हात लावून तिला धक्का दिला होता. त्यावरून त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. घडलेल्या प्रकारानंतर तिने संजय सिंघणविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस