मुंबई

एसटी प्रवाशांना १५ टक्के सवलत; जुलैपासून आरक्षण करणाऱ्यांसाठी योजना कार्यान्वित होणार

कमी गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी या उद्देशाने लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. ही योजना येत्या जुलैपासून कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा ई- शिवनेरीसारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे.

Swapnil S

मुंबई : कमी गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी या उद्देशाने लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. ही योजना येत्या जुलैपासून कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा ई- शिवनेरीसारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे.

एसटीच्या ७७व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या नावीन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय डॉ. माधव कुसेकर एसटीचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सरनाईक म्हणाले की, गेली ७७ वर्ष ऊन, वारा पाऊस याची तमा न बाळगता चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गाव खेड्यापासून आदिवासी पाड्यापर्यंत समाजातील सर्व घटकांना सातत्याने प्रवासी सेवा देण्याचे काम एसटीने अविरतपणे केलेल आहे. भविष्यात एसटी आपला शतकोत्तर महोत्सव निश्चित पूर्ण करेल! कारण महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळ एसटीला मिळालेल आहे.

७५ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहिलेल्या खूप कमी संस्था देशात अस्तित्वात आहेत. एसटी महामंडळ त्यापैकी एक आहे. आज ७७ वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एसटीचे महत्त्व यत किंचितही कमी झालेले नाही. त्यामुळे "लोकाश्रय" लाभलेली आपली एसटी भविष्यात अशीच मार्गक्रमण करत राहील, असा मला विश्वास वाटतो.

भविष्यात दळणवळण क्षेत्रात होणारे संभाव्य बदल लक्षात घेता प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ अशी "स्मार्ट एसटी" उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

‘बस फॉर अस’ या एसटीप्रेमी संस्थेने तयार केलेले गेल्या ७७ वर्षातील एसटीचा प्रवास चित्रमयरित्या दाखवण्यात आलेले एसटीचा वाहननामा हे कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित करण्यात आले. एसटीतील सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांचा "अध्यक्ष सुवर्णपदक" देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये धुळे - नंदुरबार विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते साक्री आगाराचे आगार व्यवस्थापक सुनील महाले, धुळे - नंदुरबार विभागाचे यंत्र अभियंता पंकज महाजन, जालना विभागाचे यंत्र अभियंता सुरेंद्र तांदळे व सिंधुदुर्ग विभागाचे स्थापत्य अभियंता अक्षय केंकरे यांचा सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांनादेखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या एसटीला देशातील क्रमांक एकची परिवहन संस्था निर्माण करणे हेच ध्येय असल्याचे सरनाईक म्हणाले.

एसटीच्या बदल्या आता ऑनलाइन

बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी आणि सेवा जेष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या व्हाव्यात. तसेच मानवी हस्तक्षेप पूर्णपणे थांबवा या उद्देशाने एसटीच्या सर्व बदल्या या ऑनलाइन पद्धतीने करण्याची घोषणा मंत्री सरनाईक यांना केली होती. त्या योजनेचे अनावरण आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. आंतर प्रादेशिक, प्रदेशांतर्गत व विभागांतर्गत होणाऱ्या सर्व बदल्या यापुढे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. या बरोबरच विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांच्या प्रोत्साहन योजनेची शुभारंभ तसेच राज्य शासनाचा विश्वकर्मा कामगार पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचा सत्कार मंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video