मुंबई

मुलुंड डम्पिंग ग्राऊंड पावसाळ्यापासून बंद होणार; BMC ची कंत्राटदाराला अंतिम मुदत

मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड बंद होण्यास जून उजाडणार आहे. डम्पिंग ग्राऊंडमध्ये साचलेल्या ७० टन कचऱ्यापैकी ५० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड बंद होण्यास जून उजाडणार आहे. डम्पिंग ग्राऊंडमध्ये साचलेल्या ७० टन कचऱ्यापैकी ५० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. १०० टक्के कचऱ्यावर पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने कंत्राटदाराला जून २०२५ पर्यंतची मुदत दिली आहे. कचरा प्रकियेला गतीला वेग देण्याचे आदेश देत दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथे साचलेल्या ७० लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी  ७३१ कोटी रुपयांचा प्रकल्प ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आला. प्रगत कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर करून कंत्राटदाराला दरवर्षी १२ लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम देण्यात आले. मात्र कोरोना साथ आजार आणि आवश्यक परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे २०२१ पर्यंत कामाला विलंब झाला.

आजघडीला दररोज जवळपास ९ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रकल्पाची जून २०२५ची अंतिम मुदत पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या १५ हजार टन लक्ष्यापेक्षा कमी कचऱ्यावर सध्या प्रक्रिया केली जात आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.

असा आहे कचरा विल्हेवाट प्रकल्प

मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करताना प्लास्टिक, फायबर आणि लाकूड यासह दोन लाख टनांहून अधिक स्क्रॅप ज्वलनशील पदार्थांचा समावेश आहे. या पदार्थांचे तेल किंवा गोळ्यांमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी एक कचरा व्युत्पन्न इंधन युनिट आहे. दररोज २०० टन एससीएफ प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या युनिटमध्ये गोळ्या तयार करतात. सिमेंट उत्पादनात जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून ते वापरले जाते.

विलंबामुळे कंत्राटदाराला दंड 

मुलुंड डंपिंग ग्राऊंडची मुदत ऑक्टोबर २०२४ साली संपली आहे. मात्र या कामात विलंब झाल्यामुळे जून २०२५ पर्यंत त्याची मुदत वाढवली आहे. विलंबाबद्दल कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात आला आहे आणि कचऱ्यावर जलद प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्री तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video