मुंबई

मुलुंडकरांना मिळणार नवीन भव्य सभागृह ;पालिका खर्चणार २० कोटी

मुलुंड पश्चिम मुरार रोड येथील न भू क्रमांक ११३२ ए - १, आणि न भू क्रमांक ११३२ - २ ए - २ बी भूखंडावर सार्वजनिक सभागृह प्रस्तावित आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई : सामाजिक राजकीय कार्यक्रमासाठी मुलुंड पश्चिम येथील मुरार रोडवर चार हजार ६५ चौरस मीटर वर भव्य सभागृह उभारण्यात येणार आहे. बेसमेंट, तळ अधिक तीन मजली भव्य सभागृह उभारण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल २० कोटी ८९ लाख ८८ हजार ४४१ रुपये खर्च करण्यात येणार आहे.

मुलुंड पश्चिम मुरार रोड येथील न भू क्रमांक ११३२ ए - १, आणि न भू क्रमांक ११३२ - २ ए - २ बी भूखंडावर सार्वजनिक सभागृह प्रस्तावित आहे. त्यामुळे या ठिकाणी भव्य सभागृह उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी मंगळवारी निविदा मागवल्या असून पात्र कंत्राटदाराला कंत्राट देण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुलुंड पश्चिम येथे सभागृह उभारण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून मुलुंडकरांनी लावून धरली होती. अखेर पालिका प्रशासनाने या ठिकाणी भव्य सभागृह उभारण्याचा निर्णय घेतला असून, २९ डिसेंबरपर्यंत निविदा उघडण्यात येतील, असे ही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आर्ट गॅलरी

बेसमेंट तळ अधिक तीन मजली इमारतीत चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर सार्वजनिक वापरासाठी भव्य सभागृह उभारण्यात येणार आहे . तसेच आर्ट गॅलरीचाही सभागृहात समावेश असणार आहे.

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार : प्रसिद्ध रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्टवर हल्ला; तस्लीमा नसरीन यांची संतप्त प्रतिक्रिया, "जिहादींनी जेम्सला...

Navi Mumbai : मातृत्वाला काळीमा! कळंबोलीत चिमुकलीचा गळा दाबून खून

मुरबाडमध्ये विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; मुख्याध्यापक निलंबित

ठाणे महापालिका निवडणुकीत शाईऐवजी मार्कर

Mumbai : रेस्टॉरंट, हॉटेल्सवर करडी नजर; नववर्षासाठी FDA सज्ज