प्रातिनिधिक छायाचित्र  Canva
मुंबई

Mumbai : वांद्रे येथे होणार उच्च न्यायालयाचे नवे संकूल; कॅफेटेरिया, पार्किंग, निवासस्थानासह सोयीसुविधा

कॅफेटेरिया पार्किंग, न्यायाधीशांसाठी निवासस्थानासह सोयीसुविधा असलेली मुंबई उच्च न्यायालयाची वांद्रे (पूर्व) येथे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या संकुलाच्या बांधकामासाठी ३,७५० कोटींचा खर्च अपेक्षित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : कॅफेटेरिया पार्किंग, न्यायाधीशांसाठी निवासस्थानासह सोयीसुविधा असलेली मुंबई उच्च न्यायालयाची वांद्रे (पूर्व) येथे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या संकुलाच्या बांधकामासाठी ३,७५० कोटींचा खर्च अपेक्षित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे.

वांद्रे (पूर्व) येथे शासकीय वसाहतीतील सुमारे ३०.१६ एकरवर उच्च न्यायालयाचे नवीन संकुल उभारले जाणार आहे. याठिकाणी उच्च न्यायालयाचे हायकोर्ट रुम, न्यायाधीशांची दालने आणि अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीची दालने, सभागृह, ग्रंथालय याशिवाय न्यायाधीशांची निवासस्थाने, प्रशस्त वाहनतळ यांसह अनेकविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला असून तो वेळेत पूर्ण केला जाणार आहे.

मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे १६ ऑगस्ट १८६२ रोजी स्थापन झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे. ही भव्य इमारत केवळ ६ न्यायालये आणि दहा न्यायाधीशांच्या वापरासाठी तयार करण्यात आली होती. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून औद्योगिक आणि आर्थिक विकासात आघाडीवर आहे.

न्यायालयीन खोल्या, वकील चेंबर्स, कॅफेटेरिया

नवीन प्रस्तावित संकुलात न्यायालयीन खोल्या, न्यायाधीश आणि नोंदणी कर्मचाऱ्यांसाठी चेंबर्स, वकील चेंबर्स, सभागृह, ग्रंथालय याबरोबरच बँकिंग सुविधा, वैद्यकीय सुविधा, कॅफेटेरिया, कार पार्किंग, संग्रहालय अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध असतील. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या इमारतीत असणार आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव