प्रातिनिधिक छायाचित्र 
मुंबई

Mumbai : भायखळ्यात १८ मजली इमारतीतील लिफ्ट कोसळली; चौथ्या मजल्यावरून थेट खाली; ५ रहिवासी जखमी, केबल तुटल्याचा अंदाज

भायखळा परिसरातील ‘जय कृपा टॉवर’ या १८ मजली रहिवासी इमारतीत बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. लिफ्ट चौथ्या मजल्यावरून थेट खाली कोसळली.

Krantee V. Kale

मुंबई : भायखळा परिसरातील एका निवासी इमारतीत बुधवारी रात्री लिफ्ट चौथ्या मजल्यावरून थेट खाली कोसळल्याने पाच जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. जखमींना तत्काळ विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ही घटना रात्री सुमारे १०.०२ वाजता घोडपदेव क्रॉस लेन क्रमांक १ येथील ‘जय कृपा टॉवर’ या इमारतीत घडली. घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, बेस्ट, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि संबंधित बीएमसी विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

या दुर्घटनेत एकूण पाच जण जखमी झाले. त्यापैकी कल्पिता पवार (३८), यश बालविकर (२४) आणि उषा गुप्ता (५६) यांच्यावर जेजे रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात (OPD), जमुना प्रसाद शिवहरे (५०) यांच्यावर बालाजी रुग्णालयात आणि शिल्पा मोरे (५४) यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.

केबल तुटल्याचा प्राथमिक अंदाज

प्राथमिक माहितीनुसार, लिफ्टची केबल तुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण काय होते याचा सखोल तपास सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून इमारतीतील लिफ्ट यंत्रणेची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

जीएसटी २ लाख कोटी; सप्टेंबरमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन १५ टक्क्यांनी वाढले

उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांचा आज ‘नो यूपीआय डे’; डिजिटल पेमेंटला एक दिवसाचा ‘ब्रेक’; स्कॅनरवर काळे कापड टाकून निषेध

गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO

दिवाळीत म्हाडा कोकणची सोडत शक्य; २,५०० घरांचा समावेश