मुंबई

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातात ३ ठार

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाडा खडकोना गावाच्या हद्दीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कार मधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मेंढवण खिंडीच्या उतारावर मनोर गेट हॉटेलसमोर हा अपघात झाला.

Swapnil S

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाडा खडकोना गावाच्या हद्दीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कार मधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मेंढवण खिंडीच्या उतारावर मनोर गेट हॉटेलसमोर हा अपघात झाला.

एक भरधाव कार शनिवारी सकाळी मुंबईच्या दिशेने जात असताना मेंढवन खिंडीच्या उतारावर मनोर गेट हॉटेलसमोर पोहोचली. या ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर सफेद पट्टे मारण्याचे काम सुरू असल्यामुळे एक मार्गिका बंद करण्यात आली होती. याचवेळी समोर असणाऱ्या एका वाहनाने आपत्कालीन ब्रेक दाबल्याने भरधाव कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि ही कार त्या वाहनाला जाऊन धडकली. त्यानंतर कारच्या पाठीमागे असलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. त्यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.

क्लेटन वेल्स (४२), फॅबिओला वेल्स (४५), ग्लोरिया वेल्स (७३) अशी तिघांची नावे असून रेडन वेल्स (९), हेनान वेल्स (६३) या जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video