मुंबई विमानतळावर ७ मे रोजी मेगाब्लॉक; सहा तास धावपट्ट्या बंद 
मुंबई

मुंबई विमानतळावर ७ मे रोजी मेगाब्लॉक; सहा तास धावपट्ट्या बंद

मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा’वरील (सीएसएमआयए) दोन्ही धावपट्ट्या ७ मे २०२६ रोजी पावसाळापूर्व देखभालीसाठी सहा तास बंद ठेवण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा’वरील (सीएसएमआयए) दोन्ही धावपट्ट्या ७ मे २०२६ रोजी पावसाळापूर्व देखभालीसाठी सहा तास बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळी ११.०० ते संध्याकाळी १७.०० या वेळेत मुख्य धावपट्टी आणि दुय्यम धावपट्टीवरून कोणतीही उड्डाणे होणार नाहीत.

पावसाळ्याच्या काळात विमान प्रवास अधिक सुरक्षित व्हावा आणि तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी दरवर्षी ही देखभाल मोहीम राबवली जाते. या नियोजित कामामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विमानतळ प्रशासनाने सहा महिने आधीच एअरलाईन्स आणि इतर घटकांशी समन्वय साधला आहे, जेणेकरून त्यांना आपल्या विमान वेळापत्रकात योग्य बदल करता येतील.

या सहा तासांच्या कालावधीत १०३३ एकरमध्ये पसरलेल्या एअरसाइड इन्फ्रास्ट्रक्चरची बारकाईने पाहणी केली जाईल. पावसाळ्यात विमानांचे सुरक्षित टेक-ऑफ आणि लँडिंग करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट