प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

Mumbai : 'एरंगळ जत्रे'साठी बेस्टच्या ५७ अतिरिक्त बसगाड्या; सकाळी ६ वाजल्यापासून मिळणार सुविधा

मालाड (प) येथील एरंगळ गावात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील रविवारी प्रसिद्ध एरंगळ जत्रा असते. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) यांच्याकडून ५७ अतिरिक्त बसगाड्या उपलब्ध केल्या जाणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मालाड (प) येथील एरंगळ गावात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील रविवारी प्रसिद्ध एरंगळ जत्रा असते. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) यांच्याकडून ५७ अतिरिक्त बसगाड्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. दरम्यान, ही अतिरिक्त बससेवा सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत उपलब्ध राहणार असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.

ही यात्रा संपूर्ण दिवस चालत असल्याने चर्चमध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. त्यांना सुलभ व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी मालाड स्थानक (प) ते एरंगळ गाव व मढ जेट्टी, तसेच एरंगळ गाव ते चौपाटी या मार्गांवर बसमार्ग क्र. २७१, तर बोरिवली स्थानक (प) ते मढ जेट्टी या मार्गावर बसमार्ग क्र. ए-२६९ वर विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती

उपनगरीय रेल्वेने मालाड स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन तेथून एरंगळ गाव, चौपाटी व मढ जेट्टीकडे जाणाऱ्या बसफेऱ्यांमध्ये आवश्यक ती वाढ करण्यात आली आहे. प्रवासी व बसप्रवर्तन व्यवस्थापनासाठी मागाठाणे, पोयसर, दिंडोशी, गोरेगाव व ओशिवरा येथील बस आगारांतून अतिरिक्त बसनिरीक्षक व वाहतूक अधिकाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करता येणार आहे.

Pune Rain : उकाड्याने हैराण पुणेकरांना पावसाचा दिलासा! शहरातील अनेक भागांत बरसल्या सरी

NEET UG 2026 Re-Exam : उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; गेट बंद होताच गोंधळ

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन