Mumbai : बेस्ट बसने पादचाऱ्याला चिरडले  X
मुंबई

Mumbai : बेस्ट बसने पादचाऱ्याला चिरडले

भांडुप येथील कोकण नगर परिसरात बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास बेस्टच्या एका बसने पादचाऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अतुल अनंत पाडवे (४३) यांना जबर मार लागला असून मुलुंड येथील एमटी अग्रवाल रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : भांडुप येथील कोकण नगर परिसरात बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास बेस्टच्या एका बसने पादचाऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अतुल अनंत पाडवे (४३) यांना जबर मार लागला असून मुलुंड येथील एमटी अग्रवाल रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत दोन दुचाकी व रिक्षालाही बसने धडक दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ओशिवरा आगाराची एक बस भांडुप कोकण नगरकडे उजव्या बाजुस वळण घेत होती. मात्र, वळण व्यवस्थित घेता न आल्याने चालकाने बस रिव्हर्स घेतली. त्यावेळी बसच्या मागील भागाची धडक एका पादचाऱ्याला बसली. त्यामुळे तो पादचारी बसचा मागील भाग आणि झाडाची मोठी कुंडी यामध्ये अडकला. यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत बस पुढे ढकलून जखमीला बाहेर काढले. या दरम्यान बस जास्त पुढे सरकल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन दुचाकी तसेच एका रिक्षाला या बसने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच बेस्टचे विशेष बस निरीक्षक आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास बेस्टचे अधिकारी व स्थानिक पोलीस करत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक; डोंबिवलीत डॉक्टर मारहाण प्रकरणी २४ तासांनंतर कारवाई

Pune : कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; १५ ते २० कर्मचारी अडकल्याची भीती

कांदिवलीत विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू

कराड : विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चीनला एवढ्या मिरच्या का झोंबल्या?