मुंबई

Mumbai : बेस्ट बस वाहकावर चोरट्याचा चाकूहल्ला; अतिदक्षता विभागात उपचार सुरू, आरोपीला अटक 

बसमधील चोरट्याने बस वाहक अशोक डागले (४४) यांच्या खिशातून मोबाईल आणि रोख रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला. डागले यांनी चोराचा हात पकडून त्याला प्रतिकार केला. त्यावेळी चोराने...

Swapnil S

मुंबई : धारावीतील पिवळा बंगला येथे गुरुवारी रात्री बेस्ट बसमधील वाहकावर चोरट्याने चाकू हल्ला करून रक्तबंबाळ केल्याने बेस्टच्या वाहक-चालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी शहाबाज खान याला पोलिसांनी अटक केली आहे. जखमी वाहकावर सायन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

बेस्टची विक्रोळी आगाराची मार्ग क्रमांक सातवरील ही बस गुरुवारी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पिवळा बंगला येथे आली असता हा प्रकार घडला. बसमधील चोरट्याने बस वाहक अशोक डागले (४४)  यांच्या खिशातून मोबाईल आणि रोख रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला. डागले यांनी चोराचा हात पकडून त्याला प्रतिकार केला. त्यावेळी चोराने डागले यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. त्याने डागले यांच्या छातीवर तसेच पायावर वार केले. यात वाहक डागले रक्तबंबाळ झाले. चोरट्याने त्यांचा मोबाईल हिसकावून घेत पोबारा केला होता. पोलिसांनी नंतर त्याला अटक केली. डागले यांना सायन रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

कामगार संघटनांकडून निषेध 

धारावीत बस वाहकावर झालेल्या हल्ल्याचा बेस्टमधील कामगार संघटनांनी निषेध केला आहे. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी हल्ल्याचा निषेध करताना म्हटले आहे की, सरकारचे कोणत्याच गोष्टींवर नियंत्रण राहिलेले नाही. गृह विभागाच्या कामाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे महाराष्ट्राच्या जनतेवर लक्ष नसून फक्त निवडणुका कशा पद्धतीने जिंकायच्या, याकडेच त्यांचे लक्ष जास्त आहे, अशी टीका त्यांनी केली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी