Mumbai : भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव यंदा साधेपणाने; नुकसानग्रस्त मूर्तीची लोखंडी संरचना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव यंदा साधेपणाने; नुकसानग्रस्त मूर्तीची लोखंडी संरचना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत

भुलेश्वर परिसरात आगमन मिरवणुकीदर-म्यान २२ फूट उंचीची पीओपी गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले.

प्रतिनिधी

पूनम अपराज

मुंबई : भुलेश्वर परिसरात आगमन मिरवणुकीदर-म्यान २२ फूट उंचीची पीओपी गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त मूर्तीची लोखंडी संरचना तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी 'एफपीजे'ला दिली.

२० दिवसांपूर्वी कबुतरखाना, जय अंबे चौकाजवळील बलराम मर्चेंट रोडवर ही दुर्घटना घडली. सुमारे दोन टन वजनाच्या २२ फूट उंच मूर्तीचा काही भाग आगमन मिरवणुकीदरम्यान अचानक कोसळला.

भायखळ्यातील एका कार्यशाळेतून ही मूर्ती मिरवणुकीसाठी आणली जात होती. त्यावेळी मूर्तीची संरचना अचानक ढासळून मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसह अन्य नागरिकांवर कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन मुलींसह पाच जण जखमी झाले.

पोलिस सध्या फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करत असून, हा अहवाल सुमारे १० ते १५ दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता आहे. फॉरेन्सिक तपासणीतील निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करायचा की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत पोलिसांनी मूर्ती तयार करणाऱ्या शिल्पकारासह सुमारे २० जणांचे जबाब नोंदवले आहेत. मूर्तीची संरचना नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली आणि या प्रकरणात निष्काळजी-पणा किंवा सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले