Mumbai : पालिकेचे २००० सालाआधीचे, नंतरचे फोटोपासही ग्राह्य धरणार; पात्रता सर्वेक्षणातील ‘अनिर्णित’ धारावीकरांना मोठा दिलासा संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : पालिकेचे २००० सालाआधीचे, नंतरचे फोटोपासही ग्राह्य धरणार; पात्रता सर्वेक्षणातील ‘अनिर्णित’ धारावीकरांना मोठा दिलासा

वास्तव्याचा सबळ पुरावा म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात येणारा ‘फोटोपास’ (रहिवाशांना देण्यात येणारे वास्तव्याचे ओळखपत्र) सादर करूनही पात्रता सर्वेक्षणात ‘अनिर्णित’ श्रेणीत टाकण्यात आलेल्या बहुतांशी धारावीकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे.

Swapnil S

मुंबई : वास्तव्याचा सबळ पुरावा म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात येणारा ‘फोटोपास’ (रहिवाशांना देण्यात येणारे वास्तव्याचे ओळखपत्र) सादर करूनही पात्रता सर्वेक्षणात ‘अनिर्णित’ श्रेणीत टाकण्यात आलेल्या बहुतांशी धारावीकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई महापालिकेकडून रहिवाशांना २००० साला आधी आणि त्यानंतरही दिलेले फोटोपास हे सर्वेक्षणात ग्राह्य धरले जाणार आहेत.

पालिकेच्या फोटो पासवरील तारखेच्या तांत्रिक अडचणीमुळे संभ्रम निर्माण झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी कबूल केले असून यावर तोडगा काढण्यासाठी आता पाऊल उचलण्यात येणार आहे. पालिकेच्या वतीने सदनिकांचे सर्वेक्षण १ जानेवारी २००० आधी करण्यात आले असले तरीही बहुतांशी धारावीकरांनी केलेल्या अर्जानुसार वितरीत करण्यात आलेल्या फोटोपासवर यानंतरची तारीख टाकण्यात आली आहे. यामुळेच संभ्रमाचे वातावरण तयार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. धारावी पुनर्विकासावरून धारावीकरांच्या मनात शंकाकुशंका होत्या. मात्र, सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात येत आहे.

फेरतपासणीसाठी दस्तावेज पालिकेकडे

स्थानिकांकडील फोटोपासवर ‘कट ऑफ डेट’नंतरच्या तारखा असल्याने डीआरपीकडून अशा प्रकरणांची काळजीपूर्वक दखल घेतली जात आहे. यातील प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र पडताळणी करून हे दस्तावेज फेरतपासणीसाठी पालिकेच्या संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात येत आहेत. जेणेकरून हे सर्वेक्षण नेमके केव्हा झाले, याची माहिती शासनाला प्राप्त होऊ शकेल. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत असे अर्जदार पात्रतेच्या ‘अनिर्णित’ श्रेणीतच राहतील. तांत्रिक बाबींमुळे पुनर्विकापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी ही पडताळणी प्रक्रिया जलद गतीने होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पावत्यांचे रूपांतर फोटोपासमध्ये केले

पालिकेच्या वतीने धारावीमध्ये २००० आधी सर्वेक्षण प्रक्रिया राबवण्यात आली होती आणि रहिवाशांना सर्वेक्षण पावत्या देण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतेक रहिवाशांनी आपापल्या सोयीनुसार, कालांतराने या पावत्यांचे रूपांतर फोटोपासमध्ये केले. यामुळेच तारखेबाबत गोंधळ निर्माण झाला आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, पालिकेच्या वतीने धारावी पुनर्विकास प्रकल्पाला (डीआरपी) एक पत्र प्राप्त झाले असून यामध्ये अंतिम मुदतीनंतर म्हणजेच साल २००० नंतर पालिकेच्या वतीने वितरीत करण्यात आलेले फोटोपासदेखील ग्राह्य धरता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी