मुंबई

Mumbai : भटक्या कुत्र्यांची अचूक संख्या समजणार; BMC वापरणार एआय तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म

मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिका प्रशासनाने एआय तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने...

Swapnil S

मुंबई : मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिका प्रशासनाने एआय तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने भटक्या कुत्र्यांबाबतचा तपशील मिळू शकणार आहे. या प्रणालीचा वापर महापालिकेचे शेल्टरस, एनजीओ, पशु काळजीवाहक, पशू वैद्यक इत्यादींना एकत्र जोडण्यासाठी व भटक्या कुत्र्यांची माहिती गोळा करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

गोरेगाव पश्चिम येथे एका भटक्या कुत्र्यांने आठ ते दहा जणांवर हल्ला करत त्यांच्या चेहऱ्याचे, तोंडांचे लचके तोडले. त्यामुळे या हल्लेखोर भटक्या कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी दोन दिवस पी दक्षिण विभागासह पशु वैद्यकीय विभागाचे पथक तळ ठोकून होते. भटक्या कुत्र्यांची नसबंदी करूनही त्यांची संख्या आणि त्यांचा उपद्व्याप वाढत असला तरी प्राणीप्रेमी संस्थांमुळे कारवाई करण्यास महापालिका प्रशासनाला अडथळे येत आहेत.

१० हजार कुत्र्यांची माहिती मिळणार

भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्यानंतरही ही संख्या वाढत असल्याने या वाढत्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने एआय तंत्रज्ञान प्रणाली विकसित केली आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने या प्रणालीद्वारे १० हजार भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ महिन्यांच्या कालावधीसाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार असून पुढील तीन वर्षांची देखभाल करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग राबवला जाणार असून त्यासाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर मान्यता

स्माईल कौन्सिल बिझनेस इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून तयार होणारी विविध उत्पादने, सेवा व सुविधा यांना प्रोत्साहन देण्यासाठी निविदा न मागवता प्रायोगिक तत्त्वावर खरेदी व वापरात आणण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. स्माईल कौन्सिलच्या या तुकडीमध्ये इंडिकेअर एआय सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या इक्युवेटीचा समावेश करण्यात आला आहे. या नवउदमी इंडिकेअर एआय सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भटक्या श्वानांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यास मदत करण्यासाठी एआय तंत्रज्ञान प्रणाली विकसित केली असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

‘पुढील पंतप्रधान मराठीच’ या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा; विविध मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर हल्लाबोल

Thane : खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर मिळणार भरपाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय, विशेष समितीची स्थापना

कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?