Mumbai : गाळ उपसा खर्च ४०० कोटींनी कमी होणार; पालिका प्रशासनाचा दावा, मुख्य नाल्यांवर संरक्षक जाळ्या बसवणार  
मुंबई

Mumbai : गाळ उपसा खर्च ४०० कोटींनी कमी होणार; पालिका प्रशासनाचा दावा, मुख्य नाल्यांवर संरक्षक जाळ्या बसवणार

नाल्यात टाकण्यात येणारा कचरा रोखण्यासाठी आता मुख्य नाल्यांवर संरक्षक जाळ्या बसवण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : नाल्यात टाकण्यात येणारा कचरा रोखण्यासाठी आता मुख्य नाल्यांवर संरक्षक जाळ्या बसवण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी नालेसफाईवर होणारा ३०० ते ४०० कोटींचा खर्च कमी होणार असून फक्त ५० टक्के खर्च होईल, असा दावा पालिकेने केला आहे. दरम्यान, मे २०२७ व मे २०२८ पर्यंत मुख्य नाल्यांवर संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने यांनी व्यक्त केला.

नालेसफाईच्या कामांवरुन स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. रेसकोर्स नाला, कोरबा नाला आणि वडाळा ट्रक टर्मिनस परिसरातील नाल्यांमधील गाळ पूर्णपणे काढण्यात आलेला नसल्याचा आरोप करत नगरसेविका यामिनी जाधव यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नालेसफाईच्या कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

नाल्यांमधील गाळ काढण्याऐवजी केवळ मशीन उतरवण्यासाठी रॅम्प उभारले जातात आणि प्रत्यक्षात मजुरांना नाल्यात उतरवून काम करून घेतले जाते, असे त्यांनी निदर्शनास आणले. मोठ्या नाल्यांची सफाई कंत्राटदारांनी योग्य केलेली नाही, अशा तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या असून, प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. दंडात्मक कारवाई केल्याचे अधिकारी सांगतात; मात्र प्रत्यक्ष परिस्थितीत वेगळी असल्याचा बदल दिसत नसल्याचा आक्षेपही त्यांनी घेतला.

हरिश भांदिर्गे यांनीही त्यांच्या मुद्द्याला समर्थन दिले. दिवाळीच्या काळातही काही ठिकाणी पाणी साचल्याचे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, असा आरोप त्यांनी केला

नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी नाल्यांच्या आऊटफॉलचा मुद्दा उपस्थित केला. मिठागरे आणि वन विभागाच्या अखत्यारितील भागांमधून जाणारे आऊटफॉल पालिका प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात येतात का, असा सवाल त्यांनी केला.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FDA च्या कारवाईला डिजिटल पुराव्यांचे बळ; आठ ते नऊ महिन्यांत नवी यंत्रणा

‘एसटी’ कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड; १० हजार रुपयांचा बोनस जाहीर

पदसंख्या १६ हजार करा! MPSC उच्चस्तरीय समितीची शिफारस

Mumbai : बोरिवली बांधकामप्रकरणी दोन अधिकारी कचाट्यात

गोकुळचा वाद शिगेला! 'गोकुळ'ला 'अमूल'च्या घशात घालण्याचे षडयंत्र - सतेज पाटील; कोल्हापुरात सोमवारी ‘संघर्ष मोर्चा’