Mumbai : कुर्ल्यात अतिक्रमणांपासून मुक्ती; बेकायदा बांधकामे, स्टॉल जमीनदोस्त, एल विभागाची कारवाई  
मुंबई

Mumbai : कुर्ल्यात अतिक्रमणांपासून मुक्ती; बेकायदा बांधकामे, स्टॉल जमीनदोस्त, एल विभागाची कारवाई

‘पादचारी प्रथम अभियानां’तर्गत कुर्ला पश्चिमेकडील अहिल्याबाई होळकर मार्ग आणि बाजीप्रभू देशपांडे मार्गावरील बेकायदा बांधकामे स्टॉल असे एकूण २०० मीटरचे फुटपाथ अतिक्रमणमुक्त झाले आहेत.

Swapnil S

मुंबई : ‘पादचारी प्रथम अभियानां’तर्गत कुर्ला पश्चिमेकडील अहिल्याबाई होळकर मार्ग आणि बाजीप्रभू देशपांडे मार्गावरील बेकायदा बांधकामे स्टॉल असे एकूण २०० मीटरचे फुटपाथ अतिक्रमणमुक्त झाले आहेत. या अभियानांतर्गत फुटपाथवरील बेकायदा बांधकामे स्टॉल तात्पुरत्या स्वरूपातील शेड हटवण्यात आल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार २६ विभागांमध्ये पादचारी प्रथम अभियान राबविण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत एल विभागात फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्यात आली. या मोहिमेत बेकायदा झोपड्या, स्टॉल तसेच फुटपाथवरील साहित्य हटवून पादचाऱ्यांसाठी सुमारे २०० मीटर परिसर मोकळा करण्यात आला. ‘परिमंडळ ५’ च्या उपायुक्त संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एल विभागाचे सहायक आयुक्त अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली कुर्ला परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पादचारी प्रथम अभियानांतर्गत अतिक्रमण मुक्त फुटपाथ ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त अनिल जाधव यांनी सांगितले.

झोपड्या, स्टॉल हटवले

एल विभागाने अहिल्याबाई होळकर मार्ग आणि बाजीप्रभू देशपांडे मार्ग परिसरात विशेष कारवाई हाती घेतली आहे. बीट क्रमांक १३८ अंतर्गत करण्यात आलेल्या या मोहिमेत दोन झोपड्या आणि दहा स्टॉल किंवा छपरांच्या वाढीव भागांवर कारवाई करण्यात आली. तसेच फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवर ठेवलेल्या विविध साहित्याचे साठे हटवण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI पेमेंटला शुल्क लागू; २००० रु.हून अधिक - ०.४ टक्के शुल्क, २००० पर्यंत - मोफत

शिवसेना फूटप्रकरणी घटनेचे उल्लंघन नाही; एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा दावा

दिघीमध्ये जहाजबांधणी; भारतातील सर्वात मोठा प्रकल्प रायगडमध्ये, माझगाव डॉकची २७ हजार कोटींची गुंतवणूक

BEST बसचालकांची बेदरकारी वाढली; ८९८ जणांवर कारवाई, पैकी ७८९ कंत्राटी चालक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Mumbai : गोरेगावात बेस्टच्या बसचा अपघात; २ जण जखमी, Video