BMC ला १३ कोटींऐवजी द्यावे लागणार ६५ कोटी; देयकाची रक्कम वेळेवर न भरल्यामुळे भुर्दंड, २४ सप्टेंबरपर्यंत पैसे भरण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश  संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती

मुंबईत एसआयआर‌साठी मुंबई महापालिका चार महिन्यांसाठी १० कोटी ८० लाख ९३ हजार ६८१ रुपये मोजले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईत एसआयआर‌साठी मुंबई महापालिका चार महिन्यांसाठी १० कोटी ८० लाख ९३ हजार ६८१ रुपये मोजले आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील ३६ विधानसभा मतदारसंघांतील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटर नियुक्त करण्यात आली असून जून ते सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या मानधनावर हा खर्च करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत मतदारांना गणना प्रपत्रांचे वितरण, भरलेले प्रपत्र जमा करणे, त्यांचे स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन यासह मतदारांच्या नोंदी अद्ययावत करण्याची कामे करण्यात येत आहेत. ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑपरेटरची संख्या वाढली

एका डेटा एंट्री ऑपरेटरसाठी दरमहा २८ हजार ५२० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात जास्तीत जास्त ४० ऑपरेटर चार महिन्यांसाठी नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात विविध ३६ कार्यालयांसाठी एकूण १,३०४ ऑपरेटर नियुक्त करण्यात आले. या मनुष्यबळासाठी जूनमध्ये सुमारे ९३.८७ लाख रुपये, जुलैमध्ये १.८८ कोटी तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रत्येकी सुमारे ३.९९ कोटी खर्च झाल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

FSSAI ची नेस्ले इंडियावर कायदेशीर कारवाई; नियमांचे पूर्ण पालन केल्याचा कंपनीचा दावा

मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरण : पार्थ पवारांविरुध्द गुन्ह्यासाठी याचिका

Ulhasnagar : स्वीकृत नगरसेवकांच्या सात जागांसाठी रणधुमाळी; न्यायालयाच्या दणक्यानंतर निवडणुकीचा बिगुल, २४ सप्टेंबरला विशेष महासभा

MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा; रोहित पवारांनी दिली सरकारला एक आठवड्याची मुदत

कुनो अभयारण्यात चित्त्याच्या चार पिलांचा जन्म