Mumbai : शिवडीत ४५ बकरे पालिकेच्या ताब्यात 
मुंबई

Mumbai : शिवडीत ४५ बकरे पालिकेच्या ताब्यात

नेपोरेल टॉवर, रफी अहमद किडवाई मार्ग, शिवडी या ठिकाणी विनापरवानगी सुमारे ४५ बकऱ्यांची साठवणूक केली असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पालिकेने कारवाई करून हे बकरे ताब्यात घेण्याची कारवाई बुधवारी केली.

Swapnil S

मुंबई : नेपोरेल टॉवर, रफी अहमद किडवाई मार्ग, शिवडी या ठिकाणी विनापरवानगी सुमारे ४५ बकऱ्यांची साठवणूक केली असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पालिकेने कारवाई करून हे बकरे ताब्यात घेण्याची कारवाई बुधवारी केली.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्याकडे एक निनावी तक्रार प्राप्त झाली. प्राप्त तक्रारीनुसार सदर ठिकाणी स्थानिक पोलीस व रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस यांनी संयुक्त स्थळ पाहणी केली असता सदरच्या इमारतीच्या परिसरामध्ये अंदाजे ४५ बकऱ्यांची साठवणूक विनापरवानगी केल्याचे व त्यासाठी अनधिकृत तात्पुरती शेड उभारल्याचे आढळून आले.

या ठिकाणी महानगरपालिकेच्या बाजार विभाग व सहाय्यक आयुक्त एफ-दक्षिण विभाग यांनी कारवाई करून सर्व विनापरवानगी साठवलेल्या बकऱ्यांना ताब्यात घेतले व त्यांना देवनार पशुवधगृह या ठिकाणी पाठवण्यात आले. तसेच अनधिकृत तात्पुरत्या शेडवर निष्कासन कारवाई करण्यात आली. विविध विभागांच्या संयुक्त पथकामार्फत ही कारवाई पार पाडली. स्थानिक पोलिसांच्या पुरेशा संरक्षणाखाली १५ अधिकारी/कर्मचारी, २५ कामगार, २ जे.सी.बी. मशिन व एका डम्परच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले