प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

Mumbai : चेंबूरमध्ये पाणी तुंबणार नाही; गाळ उपसा, कल्व्हर्ट्स, पाईप, बॉक्स ड्रेनची सफाई; नाल्याजवळील भिंतीची पुनर्बांधणी करणार

पावसाळ्यात मुंबईत सखल भागात पाणी साचून राहू नये, यासाठी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने आतापासून कंबर कसली आहे. पालिकेच्या एम पश्चिम विभाग येणाऱ्या चेंबूरमध्ये छोटे नाले, कल्व्हर्ट्स, पाईप व बॉक्स ड्रेन, ईस्टन एक्स्प्रेस हायवेजवळील गटारांची सफाई, तर माहुल रोड येथील गणेश पटेल नाल्याजवळील भिंतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : पावसाळ्यात मुंबईत सखल भागात पाणी साचून राहू नये, यासाठी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने आतापासून कंबर कसली आहे. पालिकेच्या एम पश्चिम विभाग येणाऱ्या चेंबूरमध्ये छोटे नाले, कल्व्हर्ट्स, पाईप व बॉक्स ड्रेन, ईस्टन एक्स्प्रेस हायवेजवळील गटारांची सफाई, तर माहुल रोड येथील गणेश पटेल नाल्याजवळील भिंतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी पालिका तब्बल २२ कोटी ६० लाख रुपये खर्च करणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, गटारांची सफाई, बॉक्स ड्रेनची स्वच्छता केल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र, पावसाळ्यात मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचते आणि पालिका प्रशासनाला टिकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे यंदा पावसाळ्याच्या पाच महिने आधीपासूनच गाळ उपसा, कल्व्हर्ट्स, पाईप व बॉक्स ड्रेनची सफाई इत्यादी कामे सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. चेंबूर येथील छोटे नाले, रस्त्यांच्या बाजूची गटारे, ईस्टन एक्स्प्रेस हायवेलगतच्या गटारांची सफाई करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून पावसाळ्यासह पुढील १३ महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.

पर्जन्य जलवाहिनी विभागाने निविदा काढल्या

रस्त्यांवरील कल्व्हर्ट‌्स साफ करणे, बॉक्स ड्रेन, रोड साइड ड्रेनमधील गाळ काढणे, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगतच्या गटारांची सफाई करणे यासाठी गुरुवारी निविदा मागवण्यात आल्या आहेत. निविदा मागवण्यात आल्या असून पात्र कंत्राटदाराला कंत्राट देण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून देण्यात आली.

नाले सफाई करणार

'एम/डब्ल्यू' वॉर्डमधील छोटे नाले, रस्त्याच्या बाजूची गटारे, बॉक्स ड्रेन्स, पाईप ड्रेन्स, कल्व्हर्ट्स व ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे रोडलगतची गटारे, इ.मधील गाळ काढणे व साफसफाई करणे यासाठी ८ कोटी ४० लाख २५ हजार ४२६ रुपये खर्च येणार आहे.

नाल्याची भिंत पुन्हा बांधणार

चेंबूर सी. ए. नं. ५१० मधील माहूल रोड येथील गणेश पटेल नालाच्या पडझड झालेल्या आधार भिंतीच्या पुनर्बांधकामासाठी १३ कोटी ५८ लाख ४० हजार ६४५ रुपये खर्च येणार आहे.

ठाण्यात मंगळवारपासून १२ दिवस २०% पाणी कपात; न्युटिक गेट दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा कमी, बघा पाणी शटडाऊन वेळापत्रक

महाराष्ट्र सदन घोटाळा : मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता; ACBनंतर आता EDच्या प्रकरणातही दिलासा

Mumbai : सपा, राष्ट्रवादी गटाला समितीतही स्थान नाही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच समिती; एमआयएमला लॉटरी

...तर पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांचे पगार रोखू; हायकोर्टाची तंबी: प्रदूषण रोखण्यात BMC प्रशासन अपयशी!

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका : इशान, सूर्याचा झंझावात; न्यूझीलंडवर सहज मात; दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ७ गडी राखून शानदार विजय