Mumbai : अनेक कारणांनी झाड पडले; चेंबूर व्हॅन दुर्घटना प्रकरणी एकसदस्यीय समितीचा अहवाल सादर  (Photo-X)
मुंबई

Mumbai : अनेक कारणांनी झाड पडले; चेंबूर व्हॅन दुर्घटना प्रकरणी एकसदस्यीय समितीचा अहवाल सादर

चेंबूरमध्ये व्हॅनवर झाड पडण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यासाठी एक कारण देता येणार नाही, असा निष्कर्ष एकसदस्यीय चौकशी समितीने काढला आहे.

Swapnil S

मुंबई : चेंबूरमध्ये व्हॅनवर झाड पडण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यासाठी एक कारण देता येणार नाही, असा निष्कर्ष एकसदस्यीय चौकशी समितीने काढला आहे. या दुर्घटनेत विहान श्रीवास्तव (११) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेप्रकरणी नेमलेल्या एकसदस्यीय समितीने अहवाल सादर केला आहे. वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ आणि माजी कुलगुरू प्रा. डॉ. संजय देशमुख यांनी सादर केलेल्या अहवालात झाड कोसळण्यामागे एकच कारण नसून अनेक घटक कारणीभूत असल्याचे नमूद केले आहे.

त्यामुळे झाडांच्या मुळांभोवती होणारे काँक्रीटीकरण आणि विकासकामांबाबत ठोस जबाबदारी निश्चित झाली नसल्याने काँक्रीटीकरणाला पुन्हा एकदा अप्रत्यक्ष क्लीनचिट मिळाल्याची चर्चा आहे.

या दुर्घटनेनंतर महापालिकेने दोन उपायुक्तांची चौकशी समिती नेमली होती. मात्र, तिचा अहवाल अपुरा असल्याचे सांगत महापौर रितू तावडे आणि सभागृहाने तो अमान्य केला. सखोल चौकशी आणि कठोर कारवाईच्या शिफारशींसाठी तज्ज्ञांची स्वतंत्र समिती नेमण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रा. देशमुख यांची एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.

समितीने अभियांत्रिकी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण, हवामान, मृदा, जलनिस्सारण आणि रस्ते बांधकाम अशा विविध अंगांनी दुर्घटनेचा अभ्यास केला. झाडांच्या स्थिरतेवर उत्खनन, भूमिगत सुविधांची कामे, रस्ते बांधकाम, जमिनीची स्थिती आणि जलनिस्सारणातील बदलांचा परिणाम होतो, असे निरीक्षण नोंदवले आहे.

झाडांच्या आरोग्याचे मूल्यांकन केवळ वरवरच्या पाहणीवर न करता दीर्घकालीन बदलांचा अभ्यास करून करावे, अशी शिफारसही करण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FDA च्या कारवाईला डिजिटल पुराव्यांचे बळ; आठ ते नऊ महिन्यांत नवी यंत्रणा

‘एसटी’ कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड; १० हजार रुपयांचा बोनस जाहीर

पदसंख्या १६ हजार करा! MPSC उच्चस्तरीय समितीची शिफारस

Mumbai : बोरिवली बांधकामप्रकरणी दोन अधिकारी कचाट्यात

गोकुळचा वाद शिगेला! 'गोकुळ'ला 'अमूल'च्या घशात घालण्याचे षडयंत्र - सतेज पाटील; कोल्हापुरात सोमवारी ‘संघर्ष मोर्चा’