मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ १० मे रोजी सहा तासांकरिता बंद ठेवण्यात येणार असून अनेक विमान उड्डाणांना त्याचा फटका बसणार आहे. पावसाळापूर्व कामांसाठी तसेच दुरुस्तीकरिता हा निर्णय घेण्यात आल्याचे सीएसएमआयएच्या प्रवक्त्याने सांगितले. सकाळी ११ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही दुरुस्ती चालणार आहे. या दिवशी दोन धावपट्ट्या बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी परदेशात जाणाऱ्या विमानांचे आधीच व्यवस्थापन करावे, अशा सूचना संबंधित समभागधारकांना देण्यात आल्या आहेत.