प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

Mumbai : कोस्टल रोड सुस्साट! वांद्रे सी लिंक ते मरीन ड्राईव्ह फक्त ९ मिनिटांत; २२ महिन्यांत २ कोटी ७९ लाख वाहनांची सफर

मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला कोस्टल रोड वाहनधारकांसाठी उपयुक्त ठरला आहे. मार्च २०२४ ते जानेवारी २०२६ दरम्यानच्या काळात २२ महिन्यात तब्बल २ कोटी ७९ लाख ९४ हजार १७९ वाहनांनी कोस्टल रोडची सफर केली आहे. दरम्यान, संपूर्ण कोस्टल रोड सेवेत आल्यापासून वांद्रे सी लिंक ते मरीन ड्राईव्ह फक्त ९ मिनिटांत प्रवास करणे शक्य झाले आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला कोस्टल रोड वाहनधारकांसाठी उपयुक्त ठरला आहे. मार्च २०२४ ते जानेवारी २०२६ दरम्यानच्या काळात २२ महिन्यात तब्बल २ कोटी ७९ लाख ९४ हजार १७९ वाहनांनी कोस्टल रोडची सफर केली आहे. दरम्यान, संपूर्ण कोस्टल रोड सेवेत आल्यापासून वांद्रे सी लिंक ते मरीन ड्राईव्ह फक्त ९ मिनिटांत प्रवास करणे शक्य झाले आहे.

आडव्या-उभ्या वाढलेल्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असल्याने सोयीसुविधांमध्ये वाढ करणे काळाची गरज बनली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पूल, भूमिगत रस्ते तयार करण्यात येत असून कोस्टल रोड प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाचा ऑक्टोबर २०१८ मध्ये शुभारंभ झाला. त्यानंतर २०१९ पासून कोस्टल रोडच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि १२ मार्च २०२४ पासून हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला. कोस्टल रोड प्रवासी सेवेत आल्यापासून वांद्रे ते प्रियदर्शनी पार्कपर्यंतचा प्रवास सुस्साट झाला असून दररोज सरासरी २७ हजार वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे कोस्टल रोड मुंबईकरांसाठी वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी वरदान ठरला आहे. विशेष म्हणजे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सी लिंक दरम्यान १० किलोमीटरचा प्रवास फक्त ९ मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे.

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्‍प (दक्षिण) अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरला आहे. किनारी रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामामुळे आपण परदेशात आहोत, अशी जाणीव निर्माण होते. नरिमन पॉंईंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या उत्तर वाहिनी पुलाच्‍या आणि इतर तीन आंतरमार्गिकांच्‍या लोकार्पणामुळे राजीव गांधी सागरी सेतू (सी लिंक) ते वरळी - मरीन ड्राईव्हदरम्‍यानचा प्रवास अवघा १० ते १२ मिनिटात होत आहे.

वांद्रे येथून दक्षिण मुंबईत आणि दक्षिण मुंबईतून वांद्रे सी लिंकवरुन पुढे ये-जा करण्यासाठी कोस्टल रोड महत्त्वपूर्ण ठरला आहे.

अशी झाली वाहनांची सफर

  • मार्च २०२४ ते जानेवारी २०२६ पर्यंत २,७९,९४,१७९ गाड्यांनी कोस्टल रोडवर ये-जा केली

  • त्यापैकी दक्षिण दिशेला १,५२,२८,२४२ आणि उत्तरेला १,२७,६५,९३७ वाहनांनी ये-जा केली.

रोज सरासरी २७ हजार वाहनांची सफर

  • कोस्टल रोडवर १५ ऑगस्ट २०२५ पूर्वी दर दिवशी सरासरी दक्षिण दिशेला १९,२०९ आणि उत्तर दिशेला १५,३३० गाड्या धावत होत्या.

  • कोस्टल रोडवर १५ ऑगस्ट २०२५ नंतर २४ तास रोड खुला केल्यानंतर दर दिवशी सरासरी दक्षिण दिशेला ३०,१७७ आणि उत्तर दिशेला २७,४८८ गाड्या धावत आहेत.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार