Mumbai : केबल्स चोरीमुळे कोस्टलवरील तिसरा डोळा बंद; ६० ते ६५ CCTV कॅमेरे निकामी, संबंधित पोलीस ठाण्यात २५ FIR दाखल प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : केबल्स चोरीमुळे कोस्टलवरील तिसरा डोळा बंद; ६० ते ६५ CCTV कॅमेरे निकामी, संबंधित पोलीस ठाण्यात २५ FIR दाखल

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या कोस्टल रोडवर केबल्स चोरी व केबल्स कापण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीसीटीव्ही यंत्रणेसाठी वापरत आणलेल्या फायबर कम्युनिकेशन केबल्स कापल्यामुळे व चोरल्यामुळे ६०-६५ सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या कोस्टल रोडवर केबल्स चोरी व केबल्स कापण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीसीटीव्ही यंत्रणेसाठी वापरत आणलेल्या फायबर कम्युनिकेशन केबल्स कापल्यामुळे व चोरल्यामुळे ६०-६५ सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले आहेत. या केबल चोरीच्या घटनांसंदर्भात संबंधित कंत्राटदार मे. एल अँड टी, एचसीसी तसेच संचालन आणि देखभाल कंत्राटदार यांच्या मार्फत संबंधित पोलीस ठाण्यात आतापर्यंत अंदाजे २०-२५ एफआयआर, तक्रारी दाखल केल्या आहेत तसेच प्रतिबंधात्मक आणि पुनर्संचयनाच्या उपाययोजना म्हणून महापालिकेमार्फत अंदाजे ११० किमी. लांब अंतर भरेल, इतक्या पॉवर केबल आतापर्यंत बदलण्यात आल्या आहेत.

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) मार्गावर पथदिवे (स्ट्रीट लाइट) आणि सीसीटीव्ही यांच्या वाहिन्या (केबल) वारंवार चोरीस जाण्याच्या घटना घडत आहेत. या प्रकारास प्रतिबंध प्रशासनातील करण्यासाठी मुंबई पोलीस उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत मुंबई महानगरपालिका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार

पडली. वीज आणि सीसीटीव्ही यंत्रणेच्या वाहिन्यांची चोरी रोखण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत आहे. तसेच, अशा केबल चोरीच्या घटना वारंवार घडू नये, यासाठी प्रतिबंधक योजना आखली जात आहे. नवीन केबल टाकण्याची उपाययोजना सुरू आहे.

२०२४ ला कॅमेरे बसवले

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) चे काम पूर्ण होऊन मार्च २०२४ पासून हा रस्ता रहदारीसाठी टप्याटप्याने खुला करण्यात आला आहे. किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत रस्त्यालगत आवश्यक त्या मानांकनाप्रमाणे पथदिवे व निगराणीसाठी आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

ताब्यांच्या वीज वाहिन्यांची चोरी

पथदिव्यांना वीजपुरवठा सुरुवातीला तांब्याच्या वाहिन्यांद्वारे करण्यात आला होता. परंतु कार्यान्वयनानंतर विविध ठिकाणी काही समाजकंटकांनी तांब्याच्या विद्युत वाहिन्यांची चोरी केल्याचे निदर्शनास आले. या चोरीच्या घटनांबाबत कंत्राटदारामार्फत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये प्रथम माहिती अहवाल त्या-त्या वेळी नोंदवण्यात आले आहेत.

अॅल्युमिनियम पॉवर केबल्सचीही चोरी

किनारी रस्ता हा वेगवान मार्ग अर्थात हायस्पीड रोड आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच तांब्याच्या विद्युत वाहिन्यांच्या चोरीला आळा घालण्यासाठी या समस्येवर मात करून अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तांब्याच्या विद्युत केबलच्या ऐवजी अॅल्युमिनियम केबल बसवण्यात आली होती. मात्र, स्थळ पाहणीदरम्यान असे निदर्शनास आले की, किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत महालक्ष्मी मंदिर, मद्रासी वाडी, मार्कडेश्वर मंदिर तसेच वरळी परिसरातील बहुतांश ठिकाणी समाजकंटकांकडून अॅल्युमिनियम पॉवर केबल्सची चोरी होण्याचे प्रकार सुरू झाले आणि अद्यापही असे प्रकार होत आहेत. तसेच, केबल कापण्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

केबल पुनर्स्थापना करण्यासाठी उपाययोजना

वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे रस्त्यावरील प्रकाश व्यवस्थेवर व सीसीटीव्ही निगराणी आणि दळणवळणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पॉवर केबल्सच्या चोरीमुळे, अनेक पथदिवे बंद झाले आहेत. वरळी व महालक्ष्मी मंदिराजवळील भागांसह काही विशिष्ट ठिकाणी अंधार जाणवतो आहे. मुंबई पोलिसांच्या सहकार्याने सदर सर्व केबल्स लवकरात लवकर पुनर्स्थापनेसाठी पालिका प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन; काँग्रेस, ठाकरे बंधूंचे स्वतंत्र मोर्चे

२६५ तालुक्यांत दुष्काळ; ७४ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत; कर्जवसुलीला स्थगिती, परीक्षा शुल्क माफ, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

इंडिया आघाडीची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक

निवडणूक आयोगाचा सारवासारवीचा प्रयत्न; SIR चे सर्व निर्णय सर्वानुमते

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज; भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष