Mumbai : कोस्टल रोडवरील बोगद्यात ६ वाहनांचा विचित्र अपघात; धडकेनंतर SUV ने घेतला पेट 
मुंबई

Mumbai : कोस्टल रोडवरील बोगद्यात ६ वाहनांचा विचित्र अपघात; धडकेनंतर SUV ने घेतला पेट

शुक्रवारच्या पहाटे मुंबईच्या कोस्टल रोडवर एक मोठा साखळी अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एका महिंद्रा एसयूव्ही कारने बोगद्यात उभ्या असलेल्या गाड्यांना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर एसयूव्हीने अचानक पेट घेतला. या भीषण अपघातात एकूण सहा वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिनिधी

पूनम अपराज/मुंबई

शुक्रवारच्या पहाटे मुंबईच्या कोस्टल रोडवर एक मोठा साखळी अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एका महिंद्रा एसयूव्ही कारने बोगद्यात उभ्या असलेल्या गाड्यांना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर एसयूव्हीने अचानक पेट घेतला. या भीषण अपघातात एकूण सहा वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अपघाताच्या वेळी एसयूव्ही चालकाने मद्यपान केले होते का, यासह अपघाताच्या नेमक्या कारणांचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

हा अपघात पहाटे ३ च्या सुमाराला नरिमन पॉईंटहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर घडला. कोस्टल रोडच्या बोगद्यात सुरुवातीला दोन कारची एकमेकांना धडक बसली होती. या अपघातानंतर दोन्ही गाड्या तिथेच थांबल्या आणि त्यांना पाहून इतर वाहनचालकांनीही आपली वाहने थांबवली होती. दरम्यान, पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या एका महिंद्रा एसयूव्ही चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने उभ्या असलेल्या वाहनांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे एकापाठोपाठ एक अशी सहा वाहने एकमेकांवर आदळली. धडक एवढी भीषण होती की एसयूव्हीने तत्काळ पेट घेतला, ज्यामुळे इतर वाहनचालकांमध्ये मोठी घबराट उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

दीड तास वाहतूक विस्कळीत

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी बचावले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी सुरुवातीला अपघात करणाऱ्या दोन कारच्या चालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

‘समृद्धी’वर १८ वाहनांचा अपघात, ३ जखमी

बुलढाणा : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शुक्रवारी सकाळी एका ट्रकने वाहनांच्या रांगेला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १८ वाहनांचे नुकसान झाले असून, तीन जण जखमी झाले आहेत. हा मालिका अपघात सकाळी अकराच्या सुमारास नागपूरपासून ३२१ किलोमीटर अंतरावर असलेल्या 'चेनिएज ३२१' आणि दुसरबी टोल नाक्याजवळ घडला. यापूर्वी झालेल्या एका अपघातामुळे महामार्गावरील वाहनांची रांग थांबली होती. त्यावेळी पाठीमागून वेगात आलेल्या एका ट्रकने कारला धडक दिली, ज्यामुळे कार पूर्णपणे चक्काचूर झाली. त्यानंतर रांगेत उभी असलेली इतर वाहने एकमेकांवर आदळली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बालदिन : बालपण जपूया, बालमन फुलवूया!

अमेरिकन मध्यावधी निवडणुकीचा धडा...

आजचे राशिभविष्य, १४ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Money Saving Tips : दिवाळीत भरमसाठ खर्च झाला? आता पैसे वाचवण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

UPI वापरणाऱ्या दुकानदारांसाठी खूशखबर! NPCI ने आणली शानदार स्कीम, कसा होणार फायदा? वाचा सविस्तर