मुंबई

मुंबई काँग्रेसमध्ये भूकंप होणार! 'हा' नेता शिंदे गटात जाणार?

सध्या अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचा या जागेवार दावा कायम असून ते ही जागा काँग्रेसला सोडण्यास तयार नाहीत. म्हणून देवरा नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

Rakesh Mali

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील चुरशीची लढत पार पडते. काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे या मतदार संघातून दोन वेळा खासदार झाले आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत (सध्या ठाकरे गटात असलेले) यांनी त्यांचा पराभव केला आहे. आता देवरा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. तथापि, देवरा यांनी मात्र आपण पक्षाचा राजीनामा देणार नसल्याचे सांगत केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. सावंत हे कामगार संघटनेचे मोठे नेते आहेत. तसेच, ते दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचा या जागेवार दावा कायम असून ते ही जागा काँग्रेसला सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे देवरा यांना तिकीट मिळण्याची शाश्वती नाही. म्हणूनच देवरा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तथापि, हिंदूस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, “मी अन्य पक्षात प्रवेश करणार असल्याच्या अफवा आहेत. त्या निराधार आहेत. मला विश्वास आहे की काँग्रेस नेतृत्व पक्ष कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या चिंतेचा विचार करेल” असे देवरा यांनी म्हटले.

दुसरीकडे, भाजपने दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघावर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्यानंतर देवरा यांना उमेदवारी मिळते का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप

BMC निवडणुकांआधी ठाकरेंना धक्का; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, "नाती बदलू शकतात, पण...

आठवडाभरात मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार; २४ वॉर्डांत निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती; आयुक्तांची माहिती

सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती