मुंबई

Mumbai : कुपर रुग्णालयात १३ उंदरांना पकडले; उंदरांनी दोन रुग्णांचा चावा घेतल्यानंतर प्रशासनाला जाग

विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात उंदरांनी दोन रूग्णांचा चावा घेतल्यावर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या प्रकारानंतर पालिकेच्या के पश्चिम वॉर्डच्या कीटकनाशक विभागाकडून उंदरांना पकडण्यासाठी सापळे व गोंदफास लावले होते. या सापळ्यात १३ हून अधिक उंदीर सापडल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात उंदरांनी दोन रूग्णांचा चावा घेतल्यावर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या प्रकारानंतर पालिकेच्या के पश्चिम वॉर्डच्या कीटकनाशक विभागाकडून उंदरांना पकडण्यासाठी सापळे व गोंदफास लावले होते. या सापळ्यात १३ हून अधिक उंदीर सापडल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

कुपर रुग्णालयात उंदरांनी उच्छाद मांडल्याची तक्रार अनेक रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी केली. पालिका प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. मात्र, उंदरांनी रुग्णांचा चावा घेतल्याच्या बातम्या सर्व स्तरातून प्रसिद्ध झाल्यावर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा यांनी या प्रकाराची दखल घेतली आहे. के पश्चिम विभागातील कीटकनाशक विभागातील अधिकाऱ्यांना कुपर रुग्णालयात स्वच्छता आणि दररोज पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

के पश्चिमच्या कीटकनाशक विभागाच्या वतीने रुग्णालय परिसराची तपासणी करून सर्व भिंतींमध्ये, कानाकोपऱ्यांमध्ये असणारे बिळ बुजवण्यात आले. उंदीर शिरू नयेत म्हणजे जाळ्या लावण्यात येत आहेत. तसेच महिला रुग्णकक्षांमध्ये उंदीर पकडण्यासाठी पिंजरे व गोंदफास लावण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

तीन वरिष्ठ सदस्यांची समिती

रुग्णालयातील कामकाज आणि इतर बाबींवर त्वरित कार्यवाही होण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाने तीन वरिष्ठ सदस्य असणारी पर्यवेक्षकीय समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. नीलम अंद्राडे, कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून यापूर्वी कामकाज सांभाळलेले आणि नायर रुग्णालयाचे विद्यमान अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांचा समावेश आहे. या समितीमार्फत रुग्णालयातील परिस्थितीवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंनी घरी जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट; बड्या नेत्यांच्या उपस्थितीत अडीच तास खलबतं, जागावाटपावर झाली चर्चा?

Asia Cup 2025 : भारताची आज यूएईशी सलामी! सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज

PUC नसल्यास नाही मिळणार पेट्रोल-डिझेल; "No PUC, No fuel" योजना सक्तीने राबवणार - परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

''मला फक्त घरी यायचंय''; नेपाळमध्ये अडकली भारतीय महिला खेळाडू, आंदोलकांनी हॉटेलच पेटवले, दूतावासाकडे मदतीची हाक

नागरिकांना लुटून तिजोरी भरू नका; न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून कानउघाडणी