Mumbai Airport Fire : मुंबई विमानतळाच्या ‘टर्मिनल १’मध्ये आग, Video 
मुंबई

Mumbai Airport Fire : मुंबई विमानतळाच्या ‘टर्मिनल १’मध्ये आग, Video

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (सीएसएमआयए) ‘डोमेस्टिक टर्मिनल-१’मध्ये गुरुवारी सायंकाळी किरकोळ आग लागली.

Swapnil S

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (सीएसएमआयए) ‘डोमेस्टिक टर्मिनल-१’मध्ये गुरुवारी सायंकाळी किरकोळ आग लागली.

टर्मिनल इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या '१-बी सर्कल' परिसरात सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, विमानतळ प्रशासनाने तातडीने पावले उचलल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

तळमजल्यावर लागलेल्या या आगीचा धूर वरच्या मजल्यांवर पसरल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून प्रवाशांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. विमानतळाच्या विशेष 'एअरोड्रोम रेस्क्यू अँड फायर फायटिंग' (एआरएफएफ) पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. मुंबई अग्निशमन दलानेही तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतीचे कार्य केले. मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, टर्मिनल इमारतीच्या वायर डक्टमध्ये आग लागली होती, ज्यामुळे विमानतळावरील इंटरनेट सेवेवर परिणाम झाला.

विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपत्कालीन प्रतिसाद पथकाने काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे विमानतळाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही. तांत्रिक पथकाकडून रात्री उशिरापर्यंत विद्युत पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा आढावा घेतला जात होता आणि संबंधित परिसरात कुलिंग प्रक्रिया सुरू होती.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग