Mumbai : सीएसएमटीतील आरपीएफ कोठडीत तरुणाचा मृत्यू; मृत्यूची CID चौकशी होणार  
मुंबई

Mumbai : सीएसएमटीतील आरपीएफ कोठडीत तरुणाचा मृत्यू; मृत्यूची CID चौकशी होणार

रोजगाराच्या शोधात मध्य प्रदेशातील खंडवा येथून मुंबईत आलेल्या इमरान शेख (३५) या तरुणाचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : रोजगाराच्या शोधात मध्य प्रदेशातील खंडवा येथून मुंबईत आलेल्या इमरान शेख (३५) या तरुणाचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

रोजगाराच्या शोधात दोन दिवसांपूर्वी इमरान शेख मुंबईत आला होता. २० सप्टेंबरला सकाळी १० वाजता तो सीएसएमटी येथील आरपीएफ चौकीत खंडव्याला जाणाऱ्या रेल्वेबाबत माहिती घेण्यासाठी गेला होता. यावेळी तेथे वाद झाल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या वादानंतर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी इमरानला मारहाण करून कोठडीत ठेवल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.

पोलिसांवर केला हल्ला

इमरानची वागणूक असामान्य होती. काही जण आपला जीव घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे तो सांगत होता. त्यानंतर त्याने आक्रमक होत आरपीएफचे उपनिरीक्षक अनिकेत यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याला स्वतःला इजा होऊ नये, यासाठी आरपीएफ जवानांनी ताब्यात घेतले आणि जीआरपीला माहिती दिली. दुपारी त्याला शौचालयात जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, तिथे तो बेशुद्ध अवस्थेत आढळला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको; धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम्' नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण

मुख्यमंत्री आजपासून बांधावर! दुष्काळ पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर; उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा

परतीचा पाऊसही ठरणार अपुरा; दुष्काळाचे संकट अटळ, खरिपाच्या पिकांनाही फारसा दिलासा नाही

Mumbai : रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; धार्मिक उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही - हायकोर्ट

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी