धरण क्षेत्रात पावसाची संथगती; पाणीसाठा ९ टक्क्यांवर, मुंबईकरांना किंचित दिलासा  संग्रहित छायाचित्र
मुंबई

धरण क्षेत्रात पावसाची संथगती; पाणीसाठा ९ टक्क्यांवर, मुंबईकरांना किंचित दिलासा

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असले तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर कमीच आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. ३ जुलै रोजी सातही धरणातील पाणीसाठा ८.९३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असले तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर कमीच आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. ३ जुलै रोजी सातही धरणातील पाणीसाठा ८.९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत धरण क्षेत्रातही पावसाची जोरदार हजेरी लागेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत ३ जुलै रोजी १ लाख २९ हजार ३०८ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्याने १५ मेपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. धरण क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने पाणीकपातीत आणखी वाढ करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून धरण क्षेत्रात पावसाची संथगतीने रिपरिप सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत हळुवार वाढ होत आहे.

दरम्यान, पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी तो अद्याप समाधानकारक पातळीपासून दूर असल्याने मुंबई महापालिकेने सावध भूमिका घेतली आहे.

३ जुलै रोजी पाणीसाठा (टक्केवारीत)

  • अप्पर वैतरणा - ०

  • मोडकसागर - २२.६४

  • तानसा - ४.९९

  • मध्य वैतरणा - १२.८६

  • भातसा - ६.६५

  • विहार - ६१.७६

  • तुळशी - ३९.४३

धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस ( मिमी)

  • अप्पर वैतरणा - ३८.०० मिमी

  • मोडकसागर - ३७.०० मिमी

  • तानसा - ५५ मिमी

  • मध्य वैतरणा - ३६ मिमी

  • भातसा - ७३.०० मिमी

  • विहार - १३७.०० मिमी

  • तुळशी - १६४ मिमी

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

SIR Protest : ध्रुव राठी CJP च्या आंदोलनासाठी भारतात; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, 'लढा सुरूच राहणार', दिपकेंचा निर्धार

Nana Patekar : 'मी आज आहे, उद्या नसेन'; नाना पाटेकरांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO व्हायरल

मध्यरात्री मित्राला मेसेज, श्वास घेण्यास त्रास अन्...; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम

Thane : जांभळी नाक्यावर अतिक्रमणांचा भडका; महावितरणच्या डीपीभोवतीच बांधकामाचा विळखा