मुंबई

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

मुंबईत येत्या २२ सप्टेंबरपासून मुंबईत इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू होत आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) पर्यंत जलद, स्वच्छ आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत येत्या २२ सप्टेंबरपासून मुंबईत इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू होत आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) पर्यंत जलद, स्वच्छ आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

सध्या या मार्गावर लाकडी बोटी धावत असून प्रवासाला साधारण एक तासाहून अधिक वेळ लागतो आणि भाडे प्रति प्रवासी १०० रुपये आहे. मात्र, नवीन इलेक्ट्रिक बोटींमुळे प्रवासाचा वेळ ४० मिनिटांच्या आत कमी होणार आहे.

या प्रकल्पाबाबत माहिती देताना भारत फ्रेट ग्रुपचे (बीएफजी) मालक सोहेल कझानी यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात दोन बोटी सुरू करण्यात येतील. "यापैकी एक हायब्रिड बोट असून ती सौरऊर्जा, इलेक्ट्रिक बॅटरी आणि डिझेल बॅकअपवर चालेल, तर दुसरी पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल. दोन्ही बोटी एका तासाच्या आत चार्ज करता येतील," असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढील टप्प्यात जनरेटर्स बसवल्यानंतर चार हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटी सेवेत दाखल होणार आहेत.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. आणि बीएफजी यांच्या भागीदारीत बांधलेल्या या वॉटर टॅक्सीमध्ये आलिशान सोफा-सीट्स (२०), वातानुकूलन, अत्याधुनिक नेव्हिगेशन सिस्टम स्वच्छतागृह, आणि लक्झरी प्रवासासाठी खास डिझाइन केलेले इंटीरियर आहे. १० नॉटिकल मैल प्रतितास या वेगाने धावणाऱ्या या बोटींमध्ये २ x २५ किलोवॉट मोटर्स आणि ६० किलोवॉट पॉवरपॅक असून, एका चार्जवर सलग चार तास धावू शकतात.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई

विरार येथे इमारतीचा भाग कोसळला; तिघांचा मृत्यू; ९ जण जखमी