मुंबई

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून आज (दि. ६) अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. लाखो भाविक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याने शहरातील वाहतुकीवर मोठा ताण येणार आहे.

नेहा जाधव - तांबे

मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून आज (दि. ६) अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. लाखो भाविक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याने शहरातील वाहतुकीवर मोठा ताण येणार आहे. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले असून अनेक महत्त्वाचे रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कोणते रस्ते राहणार बंद?

६ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपासून ते ७ सप्टेंबर पहाटे ६ वाजेपर्यंत अनेक प्रमुख रस्ते बंद राहतील.

कुलाबा विभाग :

  • नाथालाल पारेख मार्ग (भाई बंदरकर चौक ते सय्यद मोहम्मद जमादार चौक)

  • कॅ. प्रकाश पेठे मार्ग (संत गाडगे महाराज चौक ते झुलेलाल मंदिर चौक)

मरीन ड्राईव्ह विभाग :

नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग (गरजेनुसार वाहतूक वळवली जाईल)

आझाद मैदान विभाग :

महापालिका मार्ग (सीएसएमटी जंक्शन ते मेट्रो जंक्शन)

काळबादेवी विभाग :

  • जे. एस. एस. रोड (अब्दुल करीम खान चौक ते समतानंद गद्रे चौक)

  • विठ्ठलभाई पटेल मार्ग (कस्तुरबा गांधी चौक ते भगवान श्री चंद्रप्रभा चौक)

  • बाबा साहेब जयकर मार्ग (घोडागाडी जंक्शन ते खत्तर गल्ली नाका)

  • राजा राम मोहन रॉय रोड (चारुशीला गुप्ते चौक ते प्रार्थना समाज जंक्शन)

पर्यायी मार्ग

  • कुलाबा विभागात बंद रस्त्यांवरील वाहतूक कॅ. प्रकाश पेठे मार्ग, साधु टी.एल. वासवानी मार्ग, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मेकर टॉवर, जी.डी. सोमानी मार्ग या मार्गे वळवली जाईल.

  • आझाद मैदान विभागातील बंद असलेल्या महापालिका मार्गावरील वाहतूक डी.एन. रोड आणि एल.टी. मार्गे मेट्रो जंक्शनकडे वळवली जाईल.

  • काळबादेवी विभागातील वाहतूक महर्षी कर्वे रोड, काळबादेवी रोड आणि एन.एस. रोड मार्गे वळवण्यात येईल.

इतर महत्त्वाची माहिती

  • ६ सप्टेंबर सकाळी ७ वाजल्यापासून ते ७ सप्टेंबर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण बृहन्मुंबई परिसरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल.

  • उत्तर ते दक्षिण मुंबई किंवा दक्षिण ते उत्तर मुंबई जाणाऱ्यांनी कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • नागरिकांची सोय व्हावी म्हणून तीनही मार्गांवरील लोकल ट्रेन रात्रभर सुरू राहणार आहेत.

विसर्जनासाठी प्रमुख ठिकाणे : गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी-जंक्शन आणि पवई गणेश घाट.

मुंबई पोलिसांनी केलेल्या या नियोजनामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. भाविकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात; साखरझोपेत असताना २ चिमुकल्यांना अज्ञात वाहनाने चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

दरकपातीचा लाभ मिळणार सामान्यांना! GST सुधारणांचा हेतू स्पष्ट करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विश्वास

GST सुधारणांमुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री वाढेल : मुकेश अंबानी