Mumbai : विसर्जन सोहळ्यात परदेशी पर्यटक सहभागी होणार; विशेष दालन उभारणार, पर्यटन विभागाचा उपक्रम  X - @mybmc
मुंबई

Mumbai : विसर्जन सोहळ्यात परदेशी पर्यटक सहभागी होणार; विशेष दालन उभारणार, पर्यटन विभागाचा उपक्रम

अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील ऐतिहासिक गिरगाव चौपाटी येथे होणाऱ्या भव्य गणेश विसर्जन सोहळ्याचा अनुभव परदेशी पर्यटकांना घेता यावा, यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाद्वारे विशेष दालन उभारण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील ऐतिहासिक गिरगाव चौपाटी येथे होणाऱ्या भव्य गणेश विसर्जन सोहळ्याचा अनुभव परदेशी पर्यटकांना घेता यावा, यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाद्वारे विशेष दालन उभारण्यात येणार आहे. या विशेष दालनाच्या माध्यमातून परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, गणेशोत्सवाच ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व तसेच विसर्जन सोहळ्याचे भव्य स्वरूप जवळून अनुभवता येणार आहे.

गणेश विसर्जनाचा हा भव्य सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक गिरगाव चौपाटी येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांना गणपती मिरवणुकीचे दर्शन घेण्याबरोबरच गणरायाची पूजा, आरती आणि गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तिमय वातावरणामध्ये पर्यटकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाच दर्शन घडणार आहे.

गणेशोत्सवासारख्या लोकसहभागातून साजऱ्या होणाऱ्या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख परदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक पर्यटनाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटनवाढीस चालना देण्यात येत आहे.
शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री
परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने गिरगाव चौपाटी येथे विशेष दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या दालनाच्या माध्यमातून गणेशोत्सवाची ऐतिहासिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक पार्श्वभूमी पर्यटकांना समजावून सांगण्यात येणार आहे.
संजय खंदारे, अपर मुख्य सचिव, पर्यटन विभाग
विशेष दालनाच्या माध्यमातून परदेशी पर्यटकांना गणेशोत्सवाच्या विविध पैलूंची माहिती तसेच विसर्जन सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, आदरातिथ्य आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या विविध संधी आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल.
विकास पानसरे, संचालक, पर्यटन संचालनालय

उत्सव होणार वैशिष्ट्यपूर्ण

मुंबईतील गणेशोत्सवाला लाभलेली व्यापक लोकसहभागाची परंपरा, विविध गणेश मंडळांची सजावट, मिरवणुका आणि विसर्जन सोहळा यामुळे या उत्सवाला विशेष वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. या सांस्कृतिक अनुभवाचे नियोजनबद्ध पद्धतीने पर्यटकांसमोर सादरीकरण करण्याच्या दृष्टीने विशेष दालनाची संकल्पना राबवण्यात आली आहे. राज्यातील सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, दोन हजार सीसीटीव्हींची नजर

सरकारी शाळा बंदच्या धोरणाविरोधात धरणे; आझाद मैदानावर ५ ऑक्टोबरपासून आंदोलन; सिंधुदुर्गातून ३००० जण सहभागी होणार

‘रेंट अ गरबा पार्टनर’ ॲपवर बंदी घाला; आमदार मेहतांची मागणी

वसंत डावखरे सीडी प्रकरणात मोठा निर्णय; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची मुक्तता

Bhayandar : आहारबंदीप्रकरणी तपोवन शाळेला अल्पसंख्याक आयोगाची नोटीस; शिक्षण विभागाचीही कारणे दाखवा नोटीस