Mumbai : कारागृहांवरील ताण कमी होणार; नवीन कारागृहासाठी मानखुर्दमध्ये ११ एकर जमीन, जमीन अतिक्रमणमुक्त करून कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द (Photo-X/@cbawankule)
मुंबई

Mumbai : कारागृहांवरील ताण कमी होणार; नवीन कारागृहासाठी मानखुर्दमध्ये ११ एकर जमीन, जमीन अतिक्रमणमुक्त करून कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द

राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण आणि कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगत असलेली ११ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करून नवीन कारागृह उभारण्यासाठी मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण आणि कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगत असलेली ११ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करून नवीन कारागृह उभारण्यासाठी मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत जमिनीचा आगाऊ ताबा अधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह यांना शुक्रवारी देण्यात आला.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. केवळ एका दिवसात १२०० पेक्षा अधिक झोपड्या हटवून प्रशासनाने ११ एकर जागा मोकळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मौजे मानखुर्द, ता. कुर्ला येथील गट क्रमांक १/२ मधील ही जमीन कारागृहासाठी देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे आता कारागृह प्रशासनावर पडणारा अतिरिक्त ताण कमी होणार आहे.

मुंबईच्या सुरक्षेच्या आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बैठक घेऊन निर्णय घेतला होता.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार