मुंबई

Mumbai : रवी घई यांची मुलाविरोधात तक्रार

ग्रॅव्हिस समूहाचे संस्थापक आणि ८४ वर्षीय रवी घई यांनी मुलगा गौरव घई यांच्याविरोधात बनावट कागदपत्रे तयार करणे आणि फसवणूक केल्याचे आरोप करत पुन्हा तक्रार दाखल केली आहे.

Swapnil S

किरण तारे/मुंबई

विविध व्यवसायांच्या यशस्वी संचालनासाठी ओळखल्या जाणाऱ्या घई कुटुंबातील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. ग्रॅव्हिस समूहाचे संस्थापक आणि ८४ वर्षीय रवी घई यांनी मुलगा गौरव घई यांच्याविरोधात बनावट कागदपत्रे तयार करणे आणि फसवणूक केल्याचे आरोप करत पुन्हा तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी २८ ऑक्टोबरला नवी दिल्लीत तक्रार केल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीही नवी दिल्लीत अशीच तक्रार नोंदवण्यात आली होती, जी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली होती. हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याचे नमूद करत आर्थिक गुन्हे शाखेने १५ एप्रिल २०२६ रोजी चौकशी बंद केली होती, असे गौरव यांच्या प्रवक्त्याने सांगितले.

कंपनीच्या नोंदींचा गैरवापर करून गौरव यांनी कंपनीचा ताबा मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. आपले समभाग गौरव यांना दिल्याचे दाखवण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. घई यांच्याकडील सुमारे नऊ टक्के समभाग गौरव यांना भेट दिल्याचे दाखवण्यात आले होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : परळ स्थानकातील पादचारी पुलाचा जिना तोडणार; प्रस्तावित पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मोडतोड

कसारा-CSMT लोकलमध्ये थरार; बिडी ओढण्यास विरोध करताच प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला, तिघे फरार

Mumbai : कचरा हटविण्याचे आव्हान; केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून झाडाझडती, कचऱ्यापासून ऊर्जानिमिर्ती प्रकल्प राबवा

झाडे लावून मुंबईची हवा शुद्ध होणार नाही, बसेस वाढवा; प्रवीणसिंह परदेशी यांचा महापौरांना सल्ला

मुंबईतील बंद हायड्रंटचे ऑडिट करा; दिक्षा कारकर यांचे आयुक्तांना पत्र