मुंबई उच्च न्यायालय 
मुंबई

...म्हणून कामामुळेच मृत्यू कसा? मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा; कुटुंबियांना भरपाई नाकारली

केवळ नोकरीवर असताना किंवा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाला म्हणून तो मृत्यू कामामुळेच झाल्याचे म्हणू शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.

Swapnil S

मुंबई : केवळ नोकरीवर असताना किंवा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाला म्हणून तो मृत्यू कामामुळेच झाल्याचे म्हणू शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. अपघात आणि वैयक्तिक दुखापत यात आकस्मिक संबंध असला पाहिजे. तसेच व्यक्तीला झालेली दुखापत वा अपघात आणि रोजगार यात आकस्मिक संबंध पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले. हा निर्वाळा देतानाच न्यायालयाने कुर्य्यातील मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांचा भरपाईचा दावा मान्य करण्यास नकार दिला.

बसचालक असलेल्या ब्रिजल यादवचा तो काम करीत असणाऱ्या कंपनीच्या बसमध्ये १६ डिसेंबर २०२१ रोजी मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू ड्युटीवर असल्याने झाल्याचे निदर्शनास आणून देत यादव कुटुंबियांनी भरपाईसाठी दावा केला होता. त्यांचा दावा मुंबईतील कामगार न्यायालयाने मान्य केला होता. त्या निर्णयाला आव्हान देत अर्जुन ट्रॅव्हल्सने उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्यावर न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने निर्णय दिला.

न्यायालय काय म्हणाले?

कंपनीत काम करणाऱ्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच हंगामी कर्मचारीदेखील भरपाईचा दावा करुन शकतात. मात्र इतर गोष्टींची पूर्तता असणे आवश्यक असते. या प्रकरणातील उपलब्ध पुराव्यांनुसार कर्मचाऱ्याचा मृत्यू कोरोनरी धमनी रोगामुळे झाला आहे. केवळ नोकरीदरम्यान मृत्यू झाला म्हणून कामाचे स्वरूप हेच मृत्यूचे एकमेव कारण असल्याचे म्हणता येणार नाही. वास्तविक कर्मचाऱ्याचा मृत्यू आणि रोजगार यांच्यात संबंध असणे आवश्यक आहे. मृत्यू नैसर्गिक कारणामुळेदेखील असू शकतो. ते पुरेसे नाही, असे न्यायमूर्ती मोडक यांनी स्पष्ट केले आणि कुटुबियांचा भरपाईचा दावा मंजूर करणाऱ्या कामगार न्यायालयाचा ६ ऑगस्ट, २०२४ रोजीचा आदेश रद्दबातल ठरवला.

Bihar Politics : यादव कुटुंब कलह तीव्र; रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, "घाणेरड्या शिव्या दिल्या, चप्पल उगारली...

न्यायालयाच्या वेळेचे मूल्य एक लाख! वेळ वाया घालविल्याबद्दल शेतकरी कुटुंबियाला दणका

Solapur : धक्कादायक! "कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे"; स्टोरी ठेवत तरुणाची आत्महत्या

विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट! शालेय सहलींसाठी राज्य परिवहनच्या नवीन बसेस; भाड्यात तब्बल ५०% सवलत

ठाण्यात पाळीव प्राण्यांसाठी पहिली गॅस शवदाहिनी