मुंबई

सोमय्या पितापुत्रांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

सोमय्याने पुढाकार घेऊन मुंबईत ठिकठिकाणी मदतनिधी उभारण्याचा घाट घातला.

प्रतिनिधी

आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी जमवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना दिलेला दिलासा मुंबई हायकोर्टाने कायम ठेवला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सोमय्या पितापुत्रांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑगस्टपर्यंत तहकूब केली.

पाकिस्तानविरुद्धच्या युद्धामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आयएनएस विक्रांत ही युद्धनौका भंगारात काढण्याऐवजी डागडुजी करण्यासाठी खासदार किरीट सोमय्यांसह त्यांचा पुत्र नील सोमय्याने पुढाकार घेऊन मुंबईत ठिकठिकाणी मदतनिधी उभारण्याचा घाट घातला. त्यातून सुमारे ५७ कोटींचा निधी जमा केला. या निधीचा सोमय्या पिता-पुत्रांनी अपहार केल्याचा आरोप करून माजी सैनिक बबन भोसले यांनी ७ एप्रिलला तक्रार दाखल केली. या तक्रारीची ट्रॉम्बे पोलिसांनी दखल घेऊन भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी सोमय्या पिता-पुत्रांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर हायकोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. त्या अर्जावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर वेळेअभावी सुनावणी होऊ न शकल्याने न्यायालयाने सुनावणी १० ऑगस्टपर्यंत तहकूब ठेवली.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले