Mumbai : एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय कर्करोगावर नियंत्रण; केईएम रुग्णालयात २८२ लाभार्थ्यांना एचपीव्हीची मात्रा  
मुंबई

Mumbai : एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय कर्करोगावर नियंत्रण; केईएम रुग्णालयात २८२ लाभार्थ्यांना एचपीव्हीची मात्रा

एचपीव्हीमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, गुदद्वार, पुरुष जननेंद्रिय, योनी व घशाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. परंतु एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. केईएम रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २८२ लाभार्थ्यांना एचपीव्ही लसीकरणाची मात्रा देण्यात आली.

Swapnil S

मुंबई : एचपीव्हीमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, गुदद्वार, पुरुष जननेंद्रिय, योनी व घशाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. परंतु एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. केईएम रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २८२ लाभार्थ्यांना एचपीव्ही लसीकरणाची मात्रा देण्यात आली.

एचपीव्ही लसीकरण जनजागृती मोहिमेद्वारे कर्करोगांचा भार कमी करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे, असे केईएम रुग्णालयाचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. शुभम सोळंके यांनी सांगितले.

केईएम मार्डतर्फे सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालयात दुसरी एचपीव्ही लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. ही मोहीम कम्युनिटी मेडिसिन, प्रसूती व स्त्रीरोग आणि भूलशास्त्र विभागांच्या सहकार्याने तसेच रोटरी क्लब ऑफ मुंबई मुलुंड ईस्ट यांच्या सहकार्याने पार पडली. या मोहिमेचा उद्देश एचपीव्ही संसर्गाबाबत जनजागृती करणे व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तसेच इतर एचपीव्हीसंबंधित कर्करोगांच्या प्रतिबंधासाठी लसीकरणाची उपलब्धता वाढवणे हा होता. निवासी डॉक्टर, एमबीबीएस विद्यार्थी, ओटी, फिजिओथेरपी व नर्सिंग विद्यार्थी व निवासी, इंटर्न, स्टाफ नर्सेस व प्राध्यापक यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

एकूण २८२ लाभार्थ्यांना भारतातील स्वदेशी, जेंडर-न्यूट्रल, क्वाड्रिव्हॅलेंट एचपीव्ही लस देण्यात आली. यापैकी १३१ लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला, तर इतरांना वेळापत्रकानुसार पुढील डोस देण्यात आले. विशेष म्हणजे २४ पुरुष लाभार्थ्यांचा सहभाग नोंदवण्यात आला, ज्यामुळे एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व पुरुषांनाही आहे याबाबतची जागरूकता वाढताना दिसून आली.

उद्यापासून राखीव पाणीसाठ्यातून पुरवठा; मुंबईच्या धरणातील पाण्याने तळ गाठला, सातही धरणांत फक्त ८.६८ टक्के पाणीसाठा 

शिवसेनेचे नेतृत्व उपरे ठरवणार नाहीत - उद्धव ठाकरे

'ऑपरेशन टायगर' यशस्वी, गुड न्यूज लवकरच - शिंदे

ओमराजेंचे ठरले! शिंदे गटात जाणार; ‘ऑपरेशन टायगर’ला गती मिळणार; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

राजकारण कराल तर राजकीय उत्तर मिळेल; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना इशारा; विधिमंडळ अधिवेशन आजपासून