Mumbai : आयआयटी प्राध्यापक मंचाचा दुल्ला यांना पाठिंबा 
मुंबई

Mumbai : आयआयटी प्राध्यापक मंचाचा दुल्ला यांना पाठिंबा

विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर प्राध्यापकाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या प्राध्यापक मंचाने प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना पाठिंबा दर्शवला आहे.

Swapnil S

मुंबई : विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर प्राध्यापकाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या प्राध्यापक मंचाने प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना पाठिंबा दर्शवला आहे.

साहिल वाकोडे असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आपल्या मुलाचा छळ होत असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी केली असून दुल्ला यांच्यासह काही जणांवर आरोप केले आहेत. या प्रकरणाचा तपास आता गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शुक्रवारी आंदोलन केले होते. रविवारी जारी केलेल्या निवेदनात प्राध्यापक मंचाने विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करून त्याच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. प्रा. दुल्ला हे संस्थेच्या सिनेटने मंजूर केलेल्या शैक्षणिक धोरणांनुसार आपली जबाबदारी पार पाडत होते, असे मंचाने म्हटले आहे.

मंचाच्या माहितीनुसार, शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सुरू असलेल्या परीक्षेत प्रा. दुल्ला हे पर्यवेक्षणाचे काम पाहत होते. त्यावेळी एका विद्यार्थ्याकडे अनधिकृतपणे स्मार्टफोन असल्याचे आणि तो परीक्षेदरम्यान त्याचा वापर करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यानंतर प्राध्यापकांनी निर्धारित प्रक्रियेनुसार संबंधित शैक्षणिक गैरप्रकाराची माहिती पुढील कारवाईसाठी संस्थेच्या अधिकाऱ्यांना दिली, असे निवेदनात नमूद केले.

आयआयटी मुंबईच्या प्राध्यापक मंचाला आमचे सहकारी प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांची प्रतिमा मलिन केली जात असल्याबद्दल अत्यंत दुःख होत आहे. ते केवळ आपली शैक्षणिक जबाबदारी पार पाडत होते आणि संस्थेने मंजूर केलेल्या प्रक्रियेचे पालन करत होते,’ असे मंचाने म्हटले आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत मंचाने अधिक तपशील दिलेला नाही. आयआयटी मुंबईच्या प्राध्यापक मंचाचे अध्यक्ष प्रा. राजकुमार एस. पंत यांनी हे निवेदन जारी केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : रविवार ठरला घातवार! विविध अपघातांमध्ये ५ जण ठार, ९ जखमी

अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई

Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक

Mira-Bhayandar : मेट्रो ब्रिजचा ब्लॉक कोसळून तरुण जखमी

परतीचा प्रवासही मुंगीच्या गतीने; मुंबई-गोवा मार्गावर वाहतूककोंडी