Mumbai Water Cut: मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात (संग्रहित छायाचित्र FPJ)
मुंबई

Mumbai Water Cut: मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात

मुंबईत शुक्रवारपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत शुक्रवारपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.

सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते.

धरणातील पाणीसाठा आणि भातसा, अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा उपलब्ध झाल्यानंतर १७ ऑगस्टपर्यंत मुंबईकरांची तहान भागवू शकतो, इतका उपलब्ध आहे. मात्र, यंदा पाऊस कमी पडणार असल्याने भविष्यात पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

ठाणे, भिवंडीतही पाणीकपात

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्याठिकाणीही शुक्रवारपासून १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

Maratha Reservation : आंदोलन रोखण्यास न्यायालयाचा नकार