मुंबई

Mumbai : किचन, डायनिंग हॉल अन् प्रसाधनगृह; जोगेश्वरीतील मीनाताई ठाकरे शिल्प ग्रामचे नूतनीकरण; कलाकारांसाठी निवास व्यवस्था

जोगेश्वरी पूर्वेकडील मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यानात राज्यभरातील कलाकार आपली कलाकृती सादर करण्यासाठी येत असतात.

Swapnil S

मुंबई : जोगेश्वरी पूर्वेकडील मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यानात राज्यभरातील कलाकार आपली कलाकृती सादर करण्यासाठी येत असतात. कलाकारांना मीनाताई ठाकरे शिल्प ग्राम याठिकाणी निवास व्यवस्थेसह किचन डायनिंग हॉल, प्रसाधनगृह अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पालिका ३ कोटी ५८ लाख खर्च करणार आहे. दरम्यान, कलाकार जोपर्यंत या ठिकाणी वास्तव्य करतील तोपर्यंतचे पैसे आकारण्यात येतील, असे पालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

जोगेश्वरी पूर्व येथील मीनाताई ठाकरे शिल्प ग्राम उद्यान ५५ हजार क्षेत्रफळावर विस्तारले आहे. महाराष्ट्राच्या व देशाच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन धडविणारे बारा बलुतेदार यांची घरे, त्यांच्या कामाचे स्वरूप, प्राचीन खेळ व नृत्य परंपरा यांची शिल्पं उभारण्यात आली आहेत. याठिकाणी राज्यातून कलाकार कलाकृती सादर करण्यासाठी येत असतात. या कलाकारांची निवास आणि भोजनाची सोय करण्याच्या दृष्टीने उद्यान विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

निविदा काढण्यात आली

या सुविधेअंतर्गत कलाकारांना राहण्यासाठी जागा, भोजन तयार करण्यासाठी स्वयंपाकघर, जेवणासाठी स्वतंत्र डायनिंग हॉल तसेच प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात येणार आहे उद्यानात आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांदरम्यान भोजन व्यवस्था करण्यासाठीही या सुविधेचा उपयोग होणार आहे. उद्यानातील कर्मचाऱ्यांच्या गरजाही यामुळे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने यासाठी निविदा प्रक्रिया राबवली असून पात्र कंत्राटदाराला बांधकाम व नूतनीकरणाचे काम देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

आकर्षक पायवाटा व वॉकिंग ट्रॅक्स

शिल्पग्राममधील विस्तीर्ण भागात फिरताना विविध ठिकाणे जोडणारे वॉकिंग ट्रॅक्स व आकर्षक पायवाटा बांधण्यात आल्या आहेत.

गजिबो आणि आसनव्यवस्था

शिल्पग्राम मध्ये विविध ठिकाणी बसण्यासाठी आसनव्यवस्था व विविध आकाराचे गजिबो उभारण्यात आले आहेत.

खेळाची उपकरणे

मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागेत विविध उपकरणे बसवण्यात आली आहेत.

उद्यानातील वैशिष्ट्य

  • आकर्षक हिरवळ व वृक्ष वेली

  • उद्यानात हिरवळीसह विविध जातीचे वृक्ष, वेली, झुडपे सौंदर्यात भर घालतात.

  • विविध रंगातून संगीताच्या तालावर चालणारे संगीतमय कारंजे या उद्यानात उपलब्ध आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Navi Mumbai : मोठी बातमी! कैलास गायकवाड यांचे निलंबन रद्द; प्रवीण गाडेंची होणार चौकशी, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय

महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार; समृद्धी, मुंबई-पुणे, मुंबई-गोवा मार्गांना प्राधान्य

बारामतीत हवा सुनेत्रा पवारांची; ‘सोमेश्वर’ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व

चार जणांवर गुन्हे दाखल; पाच दिवसांत २,२९१ अनधिकृत फलक हटवले, महापौरांच्या पुढाकारानंंतर BMC ची विशेष मोहीम

महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी; केंद्रीय पथकाच्या आढावा बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलले